जिल्हाप्रमुख कटकेंची मागणी ,पुण्यातून आढळरावांना मंत्री करा

दरम्यान उद्याच्या शपथविधीला उपस्थित राहताना पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनाही आमची मागणी कळविणार असल्याचेही श्री कटके यांनी सांगितले.
Aadhalrao-Patil-
Aadhalrao-Patil-

शिक्रापूर :पिंपरी-चिंचवड, हडपसर, पूर्वीचा खेड तर सन २००९ पासूनचा शिरुर लोकसभा मतदार संघ. अशा विस्तीर्ण परिसराचा जनसंपर्क आणि तब्बल तीन पंचवार्षीक लोकसभेचे प्रतिनिधीत्व केलेले माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांना पुण्यातून मंत्रीपद देण्याची मागणी शिवसैनिक करणार असून या मागणीबाबत पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिकांचे एकमत झाल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी दिली.

शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस अशी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्याचे मंगळवारी (दि.२६) निश्चित झाल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणारे हेही निश्चित झाले. याच पार्श्वभूमिवर आता पुणे जिल्ह्यातून प्रमुख मंत्रीपदांसाठी राष्ट्रवादीकडून दावा केला जाणार हे निश्चित !

 शिवसैनिकांकडून  माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या मंत्रीपदासाठीची व्यूहरचना सुरू केल्याची माहिती श्री कटके यांनी दिली.  याबाबत आपण पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिका-यांशी चर्चा केली असून पुण्यात नुकतीच प्रमुख पदाधिका-यांची एक बैठकही झाल्याची कटके यांनी सांगितले. 


अनुभव असलेला नेता 
     सन २००४ पासून खेड लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा मावळ, मुळशी आदी भागांसह सन २००९ पासून शिरुर लोकसभा मतदार संघामुळे भोसरी, हडपसर आदींसह उर्वरित ग्रामिण पुणे जिल्ह्याचाही चांगला दांडगा संपर्क राहिलेला आहे.

शहर-जिल्ह्यांच्या प्रमुख प्रश्नांची पूर्ण जाण असलेल्या आढळराव यांना मंत्रीपदाची संधी दिल्यास शिवसेना पक्ष वाढण्याबरोबरच सामान्य शिवसैनिकांना न्याय मिळेल यासाठी आम्हा सर्व शिवसैनिकांची मागणी आम्ही मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचेकडे करणार असून मागणी पूर्ण होई पर्यंत आमचा पाठपूरावा सुरू राहणार आहे.

दरम्यान उद्याच्या शपथविधीला उपस्थित राहताना पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनाही आमची मागणी कळविणार असल्याचेही श्री कटके यांनी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com