मुंबई : मुंबई नागपूर द्रुतगती महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव दया या मागणीसाठी आज शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
महाराष्ट्राला अखंड ठेवा ही बाळासाहेबांची सततची इच्छा होती. त्यामुळेच महाराष्ट्राचे दोन भाग जोडणाऱ्या या भव्य पुलाला त्यांचेच नाव देण्यात यावे असे निवेदन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आल्याचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांशी यावेळी मनमोकळी चर्चा केली असे समजते .

