इंदापूरच्या जागेवर शिवसेनेचा दावा; हर्षवर्धन यांच्यापुढे नवे संकट

इंदापूरच्या जागेवर शिवसेनेचा दावा; हर्षवर्धन यांच्यापुढे नवे संकट

पुणे : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे आज भाजपमध्ये प्रवेश करत असले तरी त्यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार कायम आहे .
महायुतीच्या जागा वाटपात भोसरी व इंदापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावेत, यासाठी सेना प्रयत्नीशील आहे.

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे हे यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

दोन्ही पक्षांच्या जागावाटपात भोसरी, इंदापूर, जुन्नर, भोर, खडकवासला आणि बारामती या  विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना ठाम आहे. इंदापूरची जागा ही युतीच्या काळात सेनेकडे होती. मात्र ती जागा जर भाजपला देणार असाल तर त्या बदल्यात खडकवसाला मतदारसंघ शिवसेनेला द्यावा, अशी मागणी सेनेने केली आहे. शहरातील हडपसर मतदारसंघही सेनेने मागितला आहे.

पाटील हे आज दुपारी तीन वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उमेदवारीचे आश्वासन दिले असल्याने ते याबाबत निर्धास्त असल्याचे सांगण्यात येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com