हर्षवर्धन जाधव यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवा; शिवसेनेची मागणी

..
shivsena Vs Jadhav
shivsena Vs Jadhav

औरंगाबाद - शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुखांना उद्देशून निवडणुकीच्या जाहीर सभेत असभ्य शब्दप्रयोग करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करा अशी मागणी निवेदनाद्वारे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे केली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालूक्‍यातील चिंचोली येथील जाहीर सभेत अतिशय खालच्या पातळीवर जाउन शिवसेना पक्षाला आणि पक्षप्रमुखांना उद्देशून 'सत्तार तुमच्या आईचा नवरा आहे काय' असे उदगार काढून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून शिविगाळ केली व जातीय भावना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे.

यामुळे शिवसैनिकांत संतापाची लाट निर्माण झाल्याने कन्नड विधानसभा मतदार संघात कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होउ शकतो. जाधव यांना निवडणुकीत अपात्र ठरवून त्यांना अटक करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेनेचे राजेंद्र जंजाळ, सुनीता आउलवार, विश्‍वनाथ स्वामी, कला ओझा, सुनीता देव यांचा शिष्टमंडळात समावेश होता.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com