दादा भुसे विजयी, मालेगावकरांचा विकासाला कौल; विरोधकांची संपली सद्दी

'परिवर्तन अटळ आहे'च्या घोषणेला धुडकावून लावत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा विकासाला कौल दिला. विरोधक एकवटूनही मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंगातील महायुतीचे उमेदवार ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे 24 तास सेवेतील मंत्री, मोठा जनसंपर्क, शिवसेनेच्या विविध आघाड्यांची फळी, भाजपचे पाठबळ व गेल्या पंधरा वर्षात केलेली भरीव विकासकामे या बळावर हॅट्‌ट्रीक पाठाेपाठ चौकार लगावून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.
Dada Bhuse Wins From Malegaon Outer
Dada Bhuse Wins From Malegaon Outer

मालेगाव : 'परिवर्तन अटळ आहे'च्या घोषणेला धुडकावून लावत मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा विकासाला कौल दिला. विरोधक एकवटूनही मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंगातील महायुतीचे उमेदवार ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे 24 तास सेवेतील मंत्री, मोठा जनसंपर्क, शिवसेनेच्या विविध आघाड्यांची फळी, भाजपचे पाठबळ व गेल्या पंधरा वर्षात केलेली भरीव विकासकामे या बळावर हॅट्‌ट्रीक पाठाेपाठ चौकार लगावून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.

भुसे यांचे विरोधक एकवटले असले, तरी विजयाचा आत्मविश्‍वास त्यांच्यात जाणवला नाही. सरळ लढतीत महाआघाडीचे डॉ. तुषार शेवाळे यांनी चांगली लढत दिली. या विजयाने तालुक्यातील महायुतीच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले असून विरोधकांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी जनतेच्या प्रश्‍नांवर लढावे लागेल. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भुसे यांच्या मताधिक्क्यात झालेली वाढ लक्षणीय आहे.

मालेगाव तालुक्यात भुसेंचे निर्विवाद वर्चस्व आहे. शेतकरी सहकारी संघ वगळता बाजार समिती, पंचायत समिती, महापालिकेत युतीचे वर्चस्व आहे. भुसे यांच्या विजयानंतर तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भुसे यांच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा झाली. स्थानिक पातळीवर बाजार समितीचे माजी सभापती बंडुकाका बच्छाव, उपमहापौर सखाराम घोडके, ज्येष्ठ नेते सुरेश निकम, भाजपचे मनपा गटनेते सुनील गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश कचवे, रिपाइंचे भारत चव्हाण आदींनी त्यांच्या प्रचार सभांमध्ये भुसेंच्या विकासाचा आलेख मांडला. 

रावळगाव अजंग औद्योगिक वसाहतीचा विषय मार्गी लावल्याने तरुणांची साथही त्यांना मिळाली. जिल्हा परिषद व मविप्र निवडणूक वगळता मोठी निवडणूक लढविण्याचा अनुभव डाॅ. शेवाळे व समर्थकांच्या गाठीशी नव्हता. युवा नेते अद्वय हिरे यांच्या कार्यकर्त्यांची त्यांना मोलाची मदत झाली. अद्वय हिरे, प्रसाद हिरे, राजेंद्र भोसले, डॉ. जयंत पवार यांनी त्यांना मोलाची साथ देत एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत रंग भरला. उमेदवारी अर्ज दाखल करताना भुसे समर्थकांनी केलेले शक्ती प्रदर्शन त्यांच्या विजयाला हातभार लावून गेले. युवासेनेचे आदित्य ठाकरे यांचे 'भुसेंना बढती मिळणार' हे वक्तव्यही विकासाला सहाय्यभूत ठरले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com