टाळ्या, थाळ्या, दिव्यांमुळे युद्ध हरु : शिवसेनेची टिका

पंतप्रधान जे सांगतात त्याचा सोयीस्कर अर्थ काढून लोक वागताहेत. दुसरे म्हणजे पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाहीये आणि तिसरे म्हणजे पंतप्रधानांना असंच उत्सवी वातावरण हवं आहे, असे सांगत शिवसेनेने पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या संकल्पनेवर टिका केली आहे
Shivsena Criticism on Narendra Modi Throgh Mouthpiece Saamna
Shivsena Criticism on Narendra Modi Throgh Mouthpiece Saamna

पुणे : पंतप्रधान जे सांगतात त्याचा सोयीस्कर अर्थ काढून लोक वागताहेत. दुसरे म्हणजे पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाहीये आणि तिसरे म्हणजे पंतप्रधानांना असंच उत्सवी वातावरण हवं आहे, असे सांगत शिवसेनेने पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या संकल्पनेवर टिका केली आहे. अशाने आपण युद्ध जिंकणार नाही, तर उलट हरु असेही शिवसेनेने आपल्या ''सामना'' या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे. 

५ एप्रीलला रात्री नऊ वाजता देशवासियांनी दिवे लावावेत, असे आवाहन केले होते. त्यावेळी देशभरात विचित्र घटना घडल्या यावर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. त्या दिवशी लोकांनी रस्त्यावर उतरुन चीनच्या नावाने शिव्या दिल्या असे सांगताना शिवसेना म्हणते, ''चीनला शिव्या देणे किंवा त्याविरुद्ध संताप व्यक्त करणे समजण्यासारखे आहे. पण कोरोनाशी लढताना चीनच्या जनतेने शिस्त पाळली. लाॅकडाऊनच्या काळात तिथली जनता घरीच बसून होती. चीनच्या जनतेने सरकारी आदेश पाळले म्हणून कोरोनाच्या लढाईत चीन विजयी होताना दिसतो आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही चीनला शिव्या देऊन कोरोनावर मात करता आलेली नाही,''

''अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींकडे कोरोनाशी लढण्याकरता औषधे मागितली आहेच. ट्रम्प यांनी थाळ्या, घंटा, मेणबत्त्या किंवा पणत्या मागितलेल्या नाहीत हे आपल्याकडील उत्सवी प्रजेने समजून घेतले पाहिजे. ज्यांनी गर्दी जमणार नाही याची फिकीर करायची तेच बेफिकीरपणे वागत असतेल तर कसे व्हायचे?'' असा सवालही ट्रम्प यांनी विचारला आहे. 

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची परिस्थितीत ज्या पद्धतीने हाताळत आहेत, त्याबद्दलही ''सामना''च्या अग्रलेखात कौतुक करण्यात आले आहे. पानिपतच्या युद्धात आपला पराभव झाला होतो तो अफवा आणि नियोजनशून्यता यामुळे. कोरोना युद्धाची स्थिती पानिपत सारखी होऊन नये. जनतेचा सदाशिवराव भाऊ होऊ नये. हाती मशाली आहेत, त्यात स्वतःचेच कपडे जळू नये," असेही ''सामना''ने म्हटले आहे. 

पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे, जे सांगितले तेच घडावे. उलट वागणाऱ्यांना अद्दल घडवावी. फक्त 'मरकज'वालेच नियम मोडतात, असे नाही. मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे ती शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत, असा सवाल ''सामना''ने विचारला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com