भाजपपासून दूर राहणे हे शिवसेनेच्या हिताचे आहे ? 

भाजपपासून दूर राहणे हे शिवसेनेच्या हिताचे आहे ? 

उमेश घोंगडे 

पुणे : आघाडी करून राज्यात राष्ट्रवादीच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव 2014 च्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसकडे आला होता. मात्र. कोणताही विचार न करता त्यावेळी आपण नकार दिला, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या या गौप्यस्पोटानंतर राष्ट्रवादीनेदेखील खुलासा केला. 

त्यावेळी आपला पक्ष या प्रयोगासाठी अनुकूल नव्हता, असे स्पष्टीकरण कामगार मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केला आहे. या साऱ्या चर्चेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी माजी मुख्ममंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

पाच वर्षापूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींचा गौप्यस्फोट पृथ्वीराजबाबा यांनी केल्याने नव्या राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. पुढचे काही दिवस यावर चर्चा होत राहील. आरोप-प्रत्यारोप होत राहतील. मात्र, शिवसेनेने 2014 च्या निवडणुकीनंतर घायला हवा होता ते निर्णय 2019 च्या निवडणुकीनंतर घेतला. हा निर्णय पक्ष आणि संघटना म्हणून शिवसेनेच्या निश्‍चितपणे हिताचा आहे.2014 ची निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. त्यात 122 जागा मिळवत भाजपाने बाजी मारल्याने शिवसेनेला कदाचित त्यावेळी हा प्रयोग प्रत्यक्षात आणता आला नसावा. 

मात्र, यावेळच्या निवडणुकीत भाजपा 105 वर अडकल्याने 2014 च्या प्रस्तावाचा अमंल शिवसेनेला करता आला. चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे भाजपापासून वेगळे होण्याचे वेध शिवसेनेला 2014 पासूनच लागल्याचे स्पष्ट होते. याचे कारण भाजपाकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याची सेनेच्या नेत्याने वाटत असलेली भीती हे असावे. शिवसेनेचा हात धरून भाजपाची पक्ष संघटना महाराष्ट्रात आली आणि त्यांनी हातपाय पसरले हा इतिहास कुणी नाकारू शकणार नाही. मात्र,भाजपाकडून आपलाच राजकीय घास घेतला जात असल्याची प्रथम जाणीव शिवसेनेला झाली ती 2014 च्या निवडणुकीत. 

निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच शिवसेनेबरोबर असलेली युती तोडत स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा भाजपाकडून करण्यात आली. त्यावेळी तयारीसाठी शिवसेनेकडे पुरेसा वेळ नव्हता. निकालानंतर भाजपाने 122 जागा जिंकत बहुमताच्या जवळपास पोचण्याचा प्रयत्न केला. काही अपक्षही सोबत होते. त्यामुळे भाजपाबरोबर सत्तेत जाण्याशिवाय सेनेकडे पर्याय नव्हता. 

2019 च्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने सावध पावले टाकली. युती करून निवडणूक लढवली तरी निकालानंतर भाजपा 105 वरच अडकल्याचा फायदा घेत 2014 चा मनातला प्रयोग प्रत्यक्षात आणला. सत्तेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सेनेने आघाडी केली. मात्र, पक्ष आणि संघटना म्हणून शिवसेनेसाठी भाजपापासून दूर आणि स्वतंत्र राहणे शिवसेनेच्या हिताचे आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com