शिवाजी चुंभळेंचे अधिकार रद्द करीत कॉंग्रेसचा शिवसेनेला `जोर का झटका'

राज्यातील नावाजलेल्या बाजार समितीचे सभापती, शिवसेना नेते शिवाजी चुंभळे यांचे अधिकार रद्द केले आहेत. हे सर्व अधिकार कॉंग्रेस नेते संपत सकाळे यांच्याकडे आले. त्यामुळे सहकारातील महत्त्वाच्या संस्थेत कॉंग्रेसकडून शिवसेनेला जोर का झटका बसला आहे.
shivsena comes on back foot in nashik market committee  
shivsena comes on back foot in nashik market committee  

नाशिक ः राज्यातील नावाजलेल्या बाजार समितीचे सभापती, शिवसेना नेते शिवाजी चुंभळे यांचे अधिकार रद्द केले आहेत. हे सर्व अधिकार कॉंग्रेस नेते संपत सकाळे यांच्याकडे आले. त्यामुळे सहकारातील महत्त्वाच्या संस्थेत कॉंग्रेसकडून शिवसेनेला जोर का झटका बसला आहे.

श्री. चुंभळे यांना कर्मचाऱ्याकडून लाच घेताना अटक झाली. त्यामुळे त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. त्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना कोणतेही निर्णय घेताना दहा संचालकांची संमती आवश्यक होती. त्यानंतर संचालकांनीच जिल्हा सहकार निबंधकांना पत्र देऊन हे अधिकार कॉंग्रेस नेते संपतराव सकाळे यांना देण्याची विनंती केली होती. उपसभापती युवराज कोठुळे, संचालक शंकरराव धनवटे यांसह दहा संचालकांच्या जिल्हा उपनिबंधकांनी बाजर समिती कलम 45-1 नुसार श्री. चुंभळे यांचे सभापती पदाचे अधिकार श्री. सकाळे यांना देण्याचे पत्र आज बाजार समितीला देण्यात आले आहे.

श्री. चुंभळे शिवसेनेचे नेते आहेत. आता बाजार समितीत तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, सौ. माळेकर, रवी भोये, प्रभाकर मुळाणे, विश्‍वास नागरे, संजय तुंगार यांसह दहा संचालकांनी वेगळी चुल मांडली आहे. राज्यातील आघाडीची बाजार समिती असल्याने येथे नाशिकसह नगर जिल्ह्यांतूनही शेतकरी शेतमाल विक्रीला आणतात. रोज कोट्यावधींची उलाढाल असल्याने या सत्ताकेंद्राला विशेष महत्व आहे. आता ते शिवसेनेकडून कॉंग्रेसने हिसकावून घेतल्याने राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com