Shivsena Chief Uddhav Thakrey Instructions not to Criticize NCP | Sarkarnama

उद्धव ठाकरेंच्या 'ह्या' सूचना म्हणजे नव्या सत्ता समीकरणांची नांदी?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

राज्यात भाजप -शिवसेनेतला सत्तासंघर्ष टोकाला पोहोचलेला असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विरोधात बोलू नका अशा सूचना 'मातोश्री'वर बोलावून दिल्याचे सूत्रांकडून समजते. दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांनीही थेट सत्तेत सहभागी होण्याची गळ हायकमांडला घातली आहे.

मुंबई : राज्यात भाजप -शिवसेनेतला सत्तासंघर्ष टोकाला पोहोचलेला असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बोलू नका' अशा सूचना 'मातोश्री'वर बोलावून दिल्याचे सूत्रांकडून समजते. दुसरीकडे काँग्रेसच्या आमदारांनीही थेट सत्तेत सहभागी होण्याची गळ हायकमांडला घातली आहे.

सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापनेसाठी बोलावले असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकीय घडामोडी पुन्हा एका तीव्र झाल्या आहेत. राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयाला येतील, असे या हालचालींवरुन दिसू लागले आहे. राष्ट्रवादीबद्दल उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमीका त्यामुळे महत्त्वाची आहे. 

हे देखिल वाचा - ...भाजपकडे आत्मविश्वास आहे - राऊतांचा टोमणा

दरम्यान, शिवसेनेला बाहेरून पाठींबा देण्याचासाठी काँग्रेस हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून काँग्रेस आमदरांनी बाहेरून पाठींबा देण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्याची हायकमांडकडे मागणी केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय दिल्ली हायकमांड दोन दिवसांत घेणार असल्याचे सांगण्यात येते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख