चर्चा योग्य दिशेने सुरु : उद्धव ठाकरे

राज्यात सरकार स्थापनेबाबत सुरु असलेली चर्चा योग्य दिशेने सुरु आहे. योग्य वेळी याबाबत माहिती देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. काय चर्चा झाली, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
Uddhav Thakre Shivsena Leader Meeting With Cognress Leaders in Mumbai
Uddhav Thakre Shivsena Leader Meeting With Cognress Leaders in Mumbai

मुंबई : राज्यात सरकार स्थापनेबाबत सुरु असलेली चर्चा योग्य दिशेने सुरु आहे. योग्य वेळी याबाबत माहिती देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. काय चर्चा झाली, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांबरोबर दीड तास ट्रायडंट हाॅटेलमध्ये चर्चा झाली. सुरुवातीला सातव्या मजल्यावर दोन्ही पक्षांची एकत्र बैठक झाली. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर पुन्हा एकदा काँग्रेसची स्वतंत्र बैठक सुरु झाली. शिवसेनेबरोबरच्या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. बैठक संपवून उद्धव ठाकरे ट्रायडंटमधून बाहेर पडले. मात्र, मिलिंद नार्वेकर अद्याप ट्रायडंटमध्येच आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com