Shivsena Chief Uddhav Thakray Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 जुलै 2017

27 July 1960

उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत. मुंबईच्या सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टस् मधून अप्लाईड आर्टचे पदवीधर असलेले उद्धव ठाकरे उत्तम छायाचित्रकार आहेत. इ.स. २००३ साली शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात भाजपच्या सहकार्याने सत्तेत आहे.

 

उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत. मुंबईच्या सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टस् मधून अप्लाईड आर्टचे पदवीधर असलेले उद्धव ठाकरे उत्तम छायाचित्रकार आहेत. इ.स. २००३ साली शिवसेनेचे संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात भाजपच्या सहकार्याने सत्तेत आहे. आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजय मिळाला.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळवून दिलेल्या उद्धव ठाकरे यांची २००३ साली  महाबळेश्वर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या शिबिरात शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख या पदावर एकमताने निवड झाली. जयजयकार आणि टाळ्यांच्या गजरात उद्धवजींच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याआधी शिवसेनेत शिवसेनाप्रमुख हे सर्वश्रेष्ठ नेते आणि त्यानंतर अन्य शिवसेना नेते अशी रचना होती. २००३ मध्ये यात प्रथमच बदल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करून प्रथमच कार्यकारी प्रमुख हे पद निर्माण करण्यात आले. ही शिवसेनेच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना होती.

मात्र, या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते नारायण राणे व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे शिवसेनेपासून वेगळे झाले. उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली. परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख