Shivsena bypasses Tanaji Sawant , appoints four district in charge | Sarkarnama

तानाजी सावंतांना बायपास करून शिवसेनेने जिल्ह्यासाठी दिले चार जिल्हाप्रमुख

सरकारनामा
बुधवार, 15 जानेवारी 2020

पक्षाकडून यापुढील काळात एका जिल्हाप्रमुखाची  एक संपर्कप्रमुख नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. त्यावर राज्य संपर्कप्रमुख असतील, असेही सूत्रांनी सांगितले.

सोलापूर  : सोलापूर जिल्ह्यासाठी शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या मध्यवर्ती पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. ही रचना विधानसभा मतदार संघानुसार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मतदार संघानुसार दिलेली जबाबदारी : संभाजी शिंदे (पंढरपूर-सांगोला, माळशिरस), 

गणेश वानकर (बार्शी, मोहोळ-उत्तर सोलापूर, मंगळवेढा),

 धनंजय डिकोळे (करमाळा, माढा),

 पुरुषोत्तम बरडे (तालुके- सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट).

 याप्रमाणे जिल्हाप्रमुखांवर जबाबदारी असणार आहे. या निवडी थेट मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आल्याने यात संपर्कप्रमुख तानाजी सावंत, समन्वयक शिवाजी सावंत यांची काही भूमिका नसल्याचे सांगण्यात आले. पक्षाकडून यापुढील काळात एका जिल्हाप्रमुखाची  एक संपर्कप्रमुख नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे. त्यावर राज्य संपर्कप्रमुख असतील, असेही सूत्रांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख