Shivsena BJP will win all seats in Jalgaon : Girish Mahajan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
नांदेड - भोकर मधून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे 779 मतांनी आघाडीवर
मुक्ताईनगर : चौथी फेरी भाजपच्या रोहिणी खडसें 929 ने पुढे
भोसरी - महेश लांडगे 4 हजार 387 मतांनी आघाडीवर
माहीम मतदार संघ शिवसेना सदा सरवणकर 5000 मतांनी आघाडी
चौथ्या फेरीअखेर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 25552 मताने आघाडीवर
चंद्रपूर जिल्ह्यात भाजप ला धक्का..सुधीर मुनगंटीवार वगळता भाजप चे सर्व उमेदवार पिछाडीवर...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

जळगावात जिल्ह्यात सर्वच्या जागा युतीलाच :गिरीश महाजन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

जळगाव : मी ज्योतिष्यावर किंवा कोणत्याही बाबावर विश्‍वास ठेवत नाही. त्या आकड्यांचा मी खेळही करीत नाही. मी प्रत्यक्ष जनतेत जावून त्यांच्याकडून माहिती घेवूनच आकडेवारी सांगतो आणि त्या प्रमाणेच जागा मिळतात. विधानसभा निवडणूकीतही भाजप-शिवसेना युतीला 225 जागा हमखास मिळतील ,असा दावा राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. 

जळगाव : मी ज्योतिष्यावर किंवा कोणत्याही बाबावर विश्‍वास ठेवत नाही. त्या आकड्यांचा मी खेळही करीत नाही. मी प्रत्यक्ष जनतेत जावून त्यांच्याकडून माहिती घेवूनच आकडेवारी सांगतो आणि त्या प्रमाणेच जागा मिळतात. विधानसभा निवडणूकीतही भाजप-शिवसेना युतीला 225 जागा हमखास मिळतील ,असा दावा राज्याचे जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. 

काल जळगावात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जागा किती येणार याबाबत आकडेवारीचा खेळ करणार वर्ग वेगळा आहे.असा अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लागवला होता. त्यालाही महाजन यांनी उत्तर दिले आहे.

जळगाव येथे  महाजन यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना गिरीश महाजन म्हणाले, कि गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात पक्षाने दमदार कामगिरी केली आहे. आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता,आमच्या सरकारने त्या कामात बदल करून ते सर्व कामे सुरू केली आहेत. 

आम्ही एकही नवीन कामे न घेता सिंचनाची जुनेच कामे पूर्ण करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच राज्यभरात रस्त्याची कामे सुरू केली आहेत. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचविण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे जनतेचा सरकारवर विश्‍वास निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा युतीचेच सरकार राज्यात येईल.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्टीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी विधानसभेत आकडेवारीचे अंदाज वर्तविण्याबाबत टिका केली होती, त्याला उत्तर देतांना गिरीश महाजन म्हणाले,कि आपण कोण्याही ज्योतीषाकडून किंवा बाबाकडून अंदाज घेत नाही. आपण त्यांच्यावर विश्‍वासही ठेवत नाही.

आपण प्रत्यक्ष जनतेत जावून माहिती घेतो आणि त्याच आधारावर जांगाची आकडेवारी जाहिर करतो.नाशिक, जळगाव, धुळे,महापालिका निवडणूका आणि लोकसभेच्या वेळीही आपण जाहिर केलेले आणि तेच खरे ठरले होते. आताही आपण युतीला 225 जागा हमखास मिळतील असे सांगितले आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वच्या जागा युतीलाच मिळतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही जागा मिळणार नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख