महायुतीला 240 ते 250 जागा मिळतील, आठवलेंना विश्वास 

महायुतीला 240 ते 250 जागा मिळतील, आठवलेंना विश्वास 

पुणे : विधासभा निवडणुकीत महायुतीला 240 ते 250 जागा मिळतील असा दावा करतानाच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झालेले मला आवडेल असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील विधाससभा निवडणुकीच्या प्रचार आता खऱ्या अर्थाने रंगात आला आहे. सर्वच पक्षाच्या मुलुखमैदानी तोफा आता रणांगणात उतरल्या आहेत. आठवले यांनीही नेहमीचप्रमाणे कॉंग्रेस, राष्ट्रवादीला चिमटे काढत भाजपवर नेहमीप्रमाणे स्तुतीसुमने उधळली. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, "" देशात अजुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे. त्यामुळे महायुतीला चांगले दिवस आहेत. युतीला 240 ते 250 जागा मिळतील असा मला विश्वास आहे. जानकर हे भाजपवर नाराज आहेत. भाजपने मला फसविले असा थेट आरोप जानकर यांनी केला आहे

याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की रासपच्या दोन उमेदवारांनी जानकर यांचे ऐकले नाही. त्यांनी कमळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जानकर हे नाराज आहेत. माझ्या पक्षाचे उमेदवारही कमळाच्या चिन्हावरच लढत आहेत. ते निवडून आले की त्यांना आरपीआयचे काम करावे लागेल. त्यांनी ऐकले नाही तर त्यांना मी पक्षातून काढून टाकेन असेही ते म्हणाले. 

मला उद्धव ठाकरे हे आवडत होते असे सांगतानाच लोकसभेसाठी युती झाल्यानंतर ते मला पुन्हा आवडू लागले आहेत. भाजपने मला राज्यसभा सदस्य केले आहे. त्यामुळे मी भाजपच्या जवळ आहे. राजकारणात मान अपमान सहन करीत पुढे जावे लागते. भाजपसोबत जाण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा कोणताही पर्याय नाही असेह ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com