वंचितशी एमआयएमची आघाडी तुटली तर औरंगाबादेत युतीला फायदा ?

.
jaiswal-save-shirsat
jaiswal-save-shirsat

औरंगाबादः वंचित बहुजन आघाडी सोबतच्या घरोब्यामुळेच एमआयएम पक्षाला राज्यातून एकमेव खासदार दिल्लीत पाठवता आला. प्रकाश आंबेडकरांच्या आवाहानामुळे एमआयएमचे इम्तियाज जलील यांना जिल्हाभरातून दलित व वंचितांचे भरघोस मतदान झाले. या जोरावरच एमआयएमला औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता आला होता. 

शहरातील तीनही मतदारसंघात एमआयएमला मिळालेल्या मतांमुळेच त्यांनी या जागांवर दावा सांगितला होता. मात्र वंचित सोबतची आघाडी तुटली  तर  आता विधानसभा निवडणुकीतील एमआयएमचे गणित बिघडण्याची शक्‍यता आहेआणि शिवसेना भाजप फायदा होऊ शकतो . 

एमआयएमची पक्ष बांधणी शहरी भागात मोठ्या प्रमाणात असली तरी ती ग्रामीण भागात फारसी नव्हती. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एमआयएमने पहिल्यांदा ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले होते. शहराप्रमाणेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तीन विधानसभा मतदारसंघातून एमआयएमला लक्षवेधी मते मिळाली होती. अर्थात यात वंचित आघाडीमुळे दलित व इतरांच्या मतांचा मोठा वाटा होता.

शहरातील पुर्व (92347), पश्‍चिम (71239) आणि औरंगाबाद मध्य या एमआयएमने जिकंलेल्या मतदारसंघात इम्तियाज जलील यांना सर्वाधिक (99450) मते मिळाली होती. या आधारावरच वंचित सोबतच्या बोलणीत एमआयएमने शहरातील तीनही जागांवर दावा सांगितला होता अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत जुळून आलेले दलित-मुस्लिम व इतर वंचित घटकांचे समीकरण विधानसभेत लाभदायी ठरेल हे ओळखूनच एमआयएमने मराठवाड्यातील 14 आणि राज्यात 74 जागांची मागणी केल्याचे देखील बोलले जाते.

पंरतु अव्वाच्या सव्वा जागा मागितल्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमकडे दुर्लक्ष केले.  आता शहरातील तीनही मतदारसंघ जिंकू पाहणाऱ्या एमआयएमचे स्वप्न भंगण्याची शक्‍यता आहे. शहरातील पुर्व, पश्‍चिम आणि मध्य मतदारसंघाचा विचार केला तर दलित मतांची संख्या केवळ लक्षणीयच नाही तर निर्णायक देखील आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघात इम्तियाज जलील यांचा झालेला विजय आणि पुर्वमध्ये झालेला निसटता पराभव हेच दर्शवतो. वंचितच्या मदतीने एमआयएम सत्ताधारी शिवसेना-भाजपला शहरात धक्का देऊ शकली असती. परंतु आघाडी फिस्कटली तर एमआयएमला सोपा वाटणार विजय आता अधिक कठीण बनणार आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com