shivsena bjp problem in mumbai | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कोंडीसाठी अधिकाऱ्याचा शोध सुरू

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई : शिवसेना भाजपच्या राजकारणात बळीचा बकरा ठरलेले वित्त व लेखा अधिकारी सुरेश बनसोडे यांना माघारी बोलावल्यानंतर कडक शिस्तिचा दुसरा अधिकारी मुंबई महालिकेत पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेचा कारभार तपासण्यासाठी "योग्य अधिकारी' शोधण्याची हालचाल वित्त विभागाने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई : शिवसेना भाजपच्या राजकारणात बळीचा बकरा ठरलेले वित्त व लेखा अधिकारी सुरेश बनसोडे यांना माघारी बोलावल्यानंतर कडक शिस्तिचा दुसरा अधिकारी मुंबई महालिकेत पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिकेत सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेचा कारभार तपासण्यासाठी "योग्य अधिकारी' शोधण्याची हालचाल वित्त विभागाने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शिवसेना आणि भाजपमधील दुफळी कधी लपून राहिली नाही. मुंबई महापालिकेतील सत्ता या भांडणामागचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी शिवसेना - भाजपचे नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत तुटून पडत होते. 82 जागा जिंकूनही भाजपने सत्तेत सहभागी न होता "वॉच डॉग'ची भूमिका वटवण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिकेतील हे भांडण नवे नाही; प्रत्येक वेळी शिवसेनेवर गैरव्यवहारांचा आरोप करत भाजपने विधिमंडळातही आवाज उठवला होता. 

शिवसेनेच्या पालिकेतील कारभारावर वॉच ठेवण्यासाठी पालिकेच्या इतिहासात प्रथमच सरकारच्या सेवेतील वित्त व लेखा संचालक सुरेश बनसोडे यांची ऑडिटर म्हणून सहा महिन्यांपूर्वी नेमणूक झाली होती. मात्र, शिवसेनेच्याच मर्जीने कारभार करत असल्याचा संशय आल्याने बनसोडे यांना महापालिकेने सरकारच्या सेवेत परत पाठवल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. 

बनसोडे महापालिकेतून कार्यमुक्‍त झाले असले, तरी त्यांच्या जागी नवा अधिकारी पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेच्या कारभारावर "अंकुश' ठेवणारा अधिकारी कोण असावा, याची चाचपणी वित्त विभागात सुरू आहे. 

मुख्यमंत्र्यांना साकडे 
गरज वाटल्यास महापालिकेत मुंबईबाहेरील अधिकारीही नियुक्‍त करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील असून नवा अधिकारी नियुक्‍त करण्याकरता काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख