भाजप-शिवसेनेतील नेते आघाडीच्या संपर्कात : मुजफ्फर हुसेन

भाजप-शिवसेनेतील नेते आघाडीच्या संपर्कात : मुजफ्फर हुसेन

पालघर : भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील अनेक नेते आमच्याही संपर्कात असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी केला. 

पालघर जिल्हा कॉंग्रेस कमिटी पदग्रहण आणि सत्कार समारंभ मंगळवारी (ता.30) येथील कॉंग्रेस संकुलात पार पडला. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत हुसेन बोलत होते. बहुजन विकास आघाडी, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकींबाबत चर्चा सुरू आहे. बविआ हा आमचा घटकपक्ष आहे. 

सध्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या सेना-भाजपकडून पसरवण्यात येत आहेत. या सर्वामुळे असंतुष्ट सेना-भाजपतील अनेक नेते कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. निवडणुकीनंतर खरे चित्र समोर येईल, असे हुसेन म्हणाले. 

तत्पूर्वी कॉंग्रेसने विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. विक्रमगड आणि बोईसरमधून एकच जण इच्छुक आहे; तर नालासोपारा आणि डहाणूतून एकही इच्छुक उमेदवार पुढे आला नाही. वसईतून सर्वाधिक आठ इच्छुकांनी; तर पालघरमधून पाच जणांनी मुलाखती दिल्या. विक्रमगड-बोईसर मतदारसंघातून एका जणाने मुलाखत दिली. या मुलाखती केंद्रीय सचिव व कोकण प्रभारी संदीप संतोष केणी, प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी घेतल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com