शिवसेना - भाजप युतीच्या नेत्यांची बंडखोरांना रोखताना दमछाक

uddhav_thackeray_devendra_fadnavis
uddhav_thackeray_devendra_fadnavis

मुंबई : भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली असली तरी दोन्ही पक्षातील बंडोबांच्या रुद्रावताराने युतीवर मैत्रीपुर्ण लढतीचे सावट ओढावण्याची शक्यता आहे. जे मतदारसंघ भाजपला सुटले तिथे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली अाहे.

तर जे मतदारसंघ शिवसेनेला सुटले तिथे भाजपच्या पदाधिकार्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. यामुळे बहुतांश मतदारसंघात बंडखोरांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्धार केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची दमछाक सुरू झाली आहे.

दरम्यान, युतीमधल्या बंडखोरांच्या धास्तीने भाजप व शिवसेनेनं सर्वच्या सर्व मतदारसंघात एबी फाॅर्म रवाना केले आहेत.   ऐनवेळी कोणतीही गडबड नको यासाठीची ही दक्षता असल्याचे सांगण्यात येते.

या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी युतीमधे काही जागांवर मैत्रीपुर्ण लढती करण्याची नवी खेळी समोर आणली असून दोन्ही पक्षातील नेत्यामधे यावर मतभेद सुरू झाले आहेत.

शिवसेनेनं युती करताना पुर्णपणे भाजपच्या शब्दावर विश्वास ठेवला. पण अनेक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. 

तर शिवसैनिकांनी देखील नाशिक, पुणे व नागपूर सारख्या शहरात बंड करण्याची तयारी सुरू केली आहे.

या सर्व परिस्थितीमधे काॅग्रेस व राष्ट्रवादीने या बंडखोरांना बगल देत उमेदवारी यादी जाहिर केल्यामुळे युतीच्या ईच्छुकांमधे कमालीचा संताप सुरू असल्याचे चित्र आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com