अकोल्यात पाणचट राजकारण कुणाचे? 

भाजप आणि शिवसेनेच्या येथील नेत्यांमध्ये पाणचट शब्दावरून फारच जुंपली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर "पाणचट राजकारणा'चे आरोप करीत आहेत. अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिवसेना "पोस्टर फाडण्यासारखे पाणचट राजकारण' करीत असल्याचा आरोप केला. त्याला सडेतोड उत्तर देताना डॉ. पाटील यांचे राजकारण "महापाणचट' असल्याचा सणसणीत टोला दिला. त्यामुळे पाणचट राजकारण नेमके कुणाचे, असा प्रश्‍न अकोलेकरांना पडला आहे.
अकोल्यात पाणचट राजकारण कुणाचे? 

अकोला : भाजप आणि शिवसेनेच्या येथील नेत्यांमध्ये पाणचट शब्दावरून फारच जुंपली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर "पाणचट राजकारणा'चे आरोप करीत आहेत. अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिवसेना "पोस्टर फाडण्यासारखे पाणचट राजकारण' करीत असल्याचा आरोप केला. त्याला सडेतोड उत्तर देताना डॉ. पाटील यांचे राजकारण "महापाणचट' असल्याचा सणसणीत टोला दिला. त्यामुळे पाणचट राजकारण नेमके कुणाचे, असा प्रश्‍न अकोलेकरांना पडला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना जोरदारपणे रंगणार, याच चर्चेने अकोल्याचे राजकीय क्षितिज व्यापले आहे. 

आमच्याच काही मित्रांचे पाणचट राजकारण : डॉ. रणजित पाटील 
सरकारमध्ये राहून आमचेच काही मित्र कर्जमुक्तीबाबतचे मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडण्यासारखे पाणचट राजकारण करीत असल्याचा हल्लाबोल गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. त्यामुळे स्थानिक पातळीवर आता भाजप विरुद्ध सेना असा सामना रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

कर्जमाफीचा निर्णय होण्याआधीच अकोल्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराचे पोस्टर शहरात लावले होते. कर्जमाफीचा निर्णय न होताच भाजप नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभुल करण्यात येत असल्याचा आरोप करीत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी भाजपने लावलेले हे पोस्टर फाडले होते. शिवसेनेच्या या आंदोलनाचा समाचार गृहराज्यमंत्र्यांनी भाजपने आयोजित केलेल्या सबका साथ सबका विकास संमेलनात घेतला. पोस्टर फाडण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला पालकमंत्र्यांनी पाणचट राजकारण असल्याचे म्हटले. राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना दिलासा मिळेल, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. हमीभावाने शेतमाल खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई होणार असल्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले. येणाऱ्या काळात सामूहिक पद्धतीने शेती केल्यास 25 ते लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. अद्ययावत हवामान केंद्र, जलयुक्त शिवार योजना, सर्व शेतकऱ्यांसाठी आरोग्य योजनाचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या आंदोलनाचा समाचार घेतांना रणजित पाटलांनी कॉंग्रेसवरही हल्लाबोल केला. कॉंग्रेसने केवळ मतं खेचण्यासाठी योजना राबवल्या होत्या, अशी टिकाही डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी केली. 


पालकमंत्रीच महापाणचट : शिवसेनेचा हल्लाबोल 
सरकारमध्ये राहून आमचेच काही मित्र कर्जमुक्तीबाबतचे मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडण्यासारखे पाणचट राजकारण करीत असल्याच्या पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या टीकेचा शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी खास शिवसेना स्टाईलने समाचार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या अन्यायविरुद्ध लढणाऱ्या शिवसैनिकांना पाणचट म्हणणारे अकोल्याचे पालकमंत्रीच महापाणचट असल्याचा हल्लाबोल शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी केला आहे. 

कर्जमाफीचा निर्णय होण्याआधीच अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आभाराचे पोस्टर शहरात लावले होते. कर्जमाफीचा निर्णय न होताच भाजप नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असून हा प्रकार म्हणजे मूल होण्याआधीच पेढे वाटण्याचा प्रकार असल्याची टीका करीत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी भाजपने लावलेले पोस्टर फाडले होते. शिवसेनेच्या या आंदोलनानंतर गृहराज्यमंत्र्यांनी भाजपने आयोजित केलेल्या "सबका साथ सबका विकास' संमेलनात शिवसेनेचे नाव न घेता पोस्टर फाडण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला रणजित पाटलांनी पाणचट राजकारण असल्याचे म्हटले. 

पालकमंत्र्यांच्या या टीकेवर प्रतीउत्तर देताना शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी पालकमंत्र्यांना टिकेची झोड उठवली. शेतकऱ्यांची दैनावस्था करण्यास भाजप सरकार कारणीभूत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा, दुःख न जाणता पालकमंत्र्यांकडून कर्जमुक्तीवर केवळ श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे नितीन देशमुख म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात अजून हजारो क्विंटल तूर पडून असून पालकमंत्री म्हणून आपण त्यासाठी काय केले? हजारो शेतकऱ्यांना अद्यापही तुरीचे पैसे मिळाले नसून शेतकऱ्यांची आर्थिक मुस्कटदाबी होत असताना निव्वळ श्रेय लाटण्याचे काम पालकमंत्र्यांनी केल्याची टिका नितीन देशमुख यांनी केली आहे. शेतकऱ्यांवरील अन्यायविरुद्ध लढणाऱ्या शिवसैनिकांना पाणचट म्हणणारे पालकमंत्रीच महापाणचट असल्याची प्रखर टिका नितीन देशमुख यांनी केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com