मुंबई : शिवसेना भाजपा निवडणूकित एकत्र होती, आता एकत्र आली तर मला आश्चर्य वाटणार नाही असे सांगत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मातोश्री मधील बाळासाहेबांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन अभिवादन केले. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल आमच्याकडे बहुमत आहे, असा दावा त्यांनी केला.
शिवसेना भाजपत ज्यांनी वाद लावले त्यांनीच ते मिटवायला हवेत. शिवसेना भाजपा निवडणूकित एकत्र होती, आता एकत्र आली तर मला आश्चर्य वाटणार नाही. ज्यांनी हा वाद सुरू केला त्यांनी तो मिटवावा, माझी अपेक्षा आहे की हा वाद मिटेल असे जोशी यांनी सांगितले.
शिवाजीपार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर येऊन मनोहर जोशी यांनी आदरांजली वाहिली.यावेळी त्यांनी आपल्या जुन्या आठवणी जागवत आपल्या भावना व्यक्त केल्या. मी बाळासाहेबांसोबत 45 वर्ष होतो. त्यांना जवळून अनुभवण्याची संधी मला मिळाली. त्यांनी हिंदुवाची ज्योत मनामनात पेटवून प्रत्येकाच्या मनात स्वाभिमान निर्माण केला अशा शब्दात त्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.