shivsena bjp | Sarkarnama

नगर महापौर निवडणुकीसाठी भाजपबरोबरच्या युतीस पक्षप्रमुखांची अनुकूलता

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

नगर : शिवसेनेच्या नेत्यांसह नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज मातोश्री गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशिर्वाद घेतले. आता महापौर शिवसेनेचाच करा, अशी गळही घातली. त्यावर नगरकरांचे आभार मानत ठाकरे यांनी महापालिकेत भाजपशी युतीबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिल्याने शिवसेना - भाजप युतीचे संकेत आहेत. 

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी महापौरपद घेण्यासाठी भाजप किंवा राष्ट्रवादीशी युती करण्याची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नवनिर्वाचीत नगरसेवकांनी आज मुंबई गाठली. शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड, आमदार विजय औटी, जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, संघटक घनश्‍याम शेलार, माजी महापौर सुरेखा कदम यांच्यासह सर्व नवोदित नगरसेवक आज मुंबईला गेले. 

मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. युतीचा निर्णय आपण घ्या, पण महापौर शिवसेनेचाच हवा, अशी गळ नवनिर्वाचित नगरसेवकांनी घातली. त्यावर ठाकरे यांनी बोलताना सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा गौरव केला. नेत्यांनाही शाबासकी दिली आणि नगरकरांचे विशेष आभार मानले. महापालिकेच्या माध्यमातून चांगले कामे करून भगव्याचा सन्मान वाढवा, असे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, लवकरच युतीबाबत भाजपशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितल्याने भाजपशी युती करण्याचे संकेत मिळाले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख