shivsena bjp | Sarkarnama

मुंबईतील नाला सफाईवरून शिवसेना भाजप आमने सामने

सरकारनामा
गुरुवार, 11 मे 2017

मुंबई : राज्यात सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना- भाजपमध्ये सुरू असलेल्या विसंवाद धुमसतच आहे. सेना भाजपमध्ये असलेला वाद शमला असे वाटत असतानाच आता पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईवरून आता सेना भाजपात जुंपली आहे. आगामी काळात युतीच्या नेत्यांमध्ये नालासाफाईच्या आरोपांचा "गाळ" उडणार आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नालासफाई पहाणी दौऱ्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनीही नाला सफाई पहाणी दौरा केला होता. त्यावेळी शेलारांनी शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेत 100 टक्के असमाधानी असल्याचे सांगितले होते. त्याला प्रतिउत्तर म्हणून शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी आशिष शेलार सर्टिफाईट एजन्सी नाही त्यांनी सर्टिफिकेट देण्याची गरज नसल्याची टोला लगावला आहे. मुंबईत पाणी भरले असले तर मुख्यमंत्री, आयुक्त प्रथम जबाबदार आहे. त्यानंतर शिवसेना जबाबदार असल्याचा प्रतिवादही परब यांनी केला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. शिवसेना आमदार अनिल परब आज दुपारी नालेसफाई या विषयावर माध्यमांशी संवाद साधला. आशिष शेलार यांच्यावर टीका करताना परब म्हणाले, कदाचित आशिष शेलार यांना कंत्राटदार भेटले नसतील. आणि ते कसे काम करतात असे त्यांना वाटत असेल म्हणून आशिष शेलार विरोध करत असतील असा खोचक टोलाही परब यांनी लगावला. 

दरम्यान, आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार मुख्यमंत्र्यांना भेटून नालेसफाईची तक्रार करणार आहेत. मुंबईत पावसाच्या तोंडावर नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने येणाऱ्या काळात मुंबईत पावसाचे पाणी तुंबण्याची शक्‍यता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीच या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी शेलार करणार असल्याचे समजते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख