shivsena bjp | Sarkarnama

गोहत्या बंदीवरून शिवसेनेचे भाजप सरकारला सवाल

सरकारनामा न्यूज ब्युरो 
सोमवार, 3 एप्रिल 2017

मुंबई  : भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडायची नाही असे शिवसेनेने ठरविलेले दिसते. गोहत्या बंदीवरून शिवसेनेने अतिशय आक्रमक भूमिका घेत गोहत्येला विरोध करणाऱ्यांचे अभिनंदनच करतो, मग दररोज शेतकरी आत्महत्या करतो त्यांचे काय ? याचे उत्तर भाजप सरकारने द्यावे असा रोखठोक सवाल केला आहे. 

मुंबई  : भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडायची नाही असे शिवसेनेने ठरविलेले दिसते. गोहत्या बंदीवरून शिवसेनेने अतिशय आक्रमक भूमिका घेत गोहत्येला विरोध करणाऱ्यांचे अभिनंदनच करतो, मग दररोज शेतकरी आत्महत्या करतो त्यांचे काय ? याचे उत्तर भाजप सरकारने द्यावे असा रोखठोक सवाल केला आहे. 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज भाजपवर बोचरी टीका करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला खडे बोल सुनावतानाच गोहत्या बंदीचे स्वागतही केले आहे. शिवसेनेने म्हटले आहे, की गुजरात, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात गोहत्येला विरोध करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे अभिनंदनच केलेच पाहिजे, पण ज्यांच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतात त्याचे काय ? असा सवालच शिवसेनेने केला आहे. 

गाय मारणाऱ्यांना फासावर लटकवू असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह म्हणतात. तर गुजरातमध्ये गोहत्या करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांनीही अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरू केली आहे. या सर्व घडामोडींकडे शिवसेनेने अग्रलेखातून लक्ष वेधले आहे. भाजपशासित राज्ये हळूहळू शाकाहाराकडे वळू लागली आहेत का असा सवालही उपस्थित केला आहे. गायीविषयी हिंदू समाजात ममत्व आहे. गायीला मातेचा दर्जा दिला जातो. पण देशात अनेकांसाठी गोमांस हे अन्नदेखील आहे असा दावा शिवसेनेने केला आहे. 

गोवा किंवा ईशान्येत भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये गोहत्या बंदीचे धाडस दाखवणार का असा सवालच शिवसेनेने विचारला आहे. गोहत्याबंदीसाठी केंद्र सरकारने देशभरात समान धोरण राबवले पाहिजे. जर हे शक्‍य नसेल तर समान नागरी कायदा कसा लागू करणार असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख