shivsena bjp | Sarkarnama

भाजपला मदत न करण्याचे शिवसेनेचे आदेश ?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

मुंबई जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक उदया ता 21 रोजी होणार असतानाच शिवसेनेने आक्रमकता कायम ठेवत जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपशी कोणत्याही परिस्थितीत हातमिळवणी करू नका असा निरोप दिला आहे.भाजपशी हातमिळवणी केर्लंयास शिवसेनेचे सहा ठिकाणी अध्यक्ष निवडून आले असते,कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ धरल्यास हा आकडा आठवर जातो.त्यामुळे मातोश्रीवरून कोणतेही आदेश न देता युतीसंबंधीचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडून दयायचा असा विचार शिवसेनेत पुढे आला होता मात्र निवडणुकीच्या केवळ काही तास आधी भाजपला मदत करू नका असा फतवा मातोश्रीने काढला आहे असे सांगण्यात येत होते.

शिवसेनेने यासंदर्भात कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया न देण्याचे ठरवल्याने युतीतील दरी आणखी वाढते आहे असे चित्र निर्माण झाले आहे.भाजपने विदर्भातील तीन चंद्रपूर ,वर्धा ,गडचिरोली उत्तर महाराष्ट्रातील जळगाव तसेच एक अन्य मराठवाडयातील लातूर ,बीड ,जालना तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदा हातात घेण्याची तयारी पूर्ण केली आहे.पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली येथे भाजपच्या चिन्हावर तर सोलापुरात अपक्षाला पाठिंबा देवून निवडणूक जिंकण्याची व्यूहरचना जवळपास पूर्ण केली असतानाच सेनेने या सर्व ठिकाणी भाजपचे मनसुबे धुळीत मिळवण्याची तयारी सुरू ठेवली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख