Shivsena Balasaheb Kshirsagar Nashik Zilla Parishad New President | Sarkarnama

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे गायकवाड 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 जानेवारी 2020

महाविकास आघाडीचा प्रयोग आज नाशिकमध्ये यशस्वी होऊन सलग दुस-यांदा भाजप सत्तेपासून वंचित राहिला. आज अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डाॅ सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.

नाशिक  : महाविकास आघाडीचा प्रयोग आज नाशिकमध्ये यशस्वी होऊन सलग दुस-यांदा भाजप सत्तेपासून वंचित राहिला. आज अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डाॅ सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.

आज सकाळी जिल्हा परिषद सभागृहात अत्यंत कडक बंदोबस्तात निवड प्रक्रिया पार पडली. तत्पूर्वी गोव्याला सहलीला गेलेले शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आंणि काँग्रेसचे सदस्य निवडणुकीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या 'एक्सप्रेस इन' मध्ये मुक्कामाला आले. शिवसेनेने मंत्री दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्या उमेदवारांवषयी चर्चा केली. सकाळी या सदस्यांची मत आजमावनी करण्यात आली. त्यात शिवसेनेचे क्षीरसागर, यांसह सुरेखा दराडे, शंकरराव धनवटे यांच्यात चुरस होती. 

या तासांसाठी फॉर्म हॉटेल मध्ये तयार केले. मात्र, जिल्हा परिषद सभागृहात अंतिम निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादी तर्फे उपाध्यक्ष पदासाठी सयाजी गायकवाड, सिद्धार्थ वनारसे इच्छुक होते. अतिमतः वरिष्ठ नेत्यांनी क्षिरसागर आंणि गायकवाड यांची नावे जाहीर केली. त्यांच्या विरोधात भाजपने अध्यक्षपदासाठी जे डी हिरे आणि उपाध्यक्ष पदासाठी कनू गायकवाड यांनी अर्ज दाखल केले. मात्र मतांची बेगमी होणार नसल्याने भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतली. निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये सलग दुस-यांदा जिल्हा परिषद सत्तेपासून लांब रहावे लागले. महाविकास आघाडीच्या प्रयोगाने ते घडले. माजी अध्यक्षा शीतल सांगळे आणि नयना गावित यांनी त्यांना पदभार सोपविल.

कॅबिनेट मंत्री दादा भुसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नितीन पवार, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, विजय करंजकर, सुधाकर बडगुजर आदी जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणूक प्रक्रियेदरम्यान दालनात बसून होते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख