शिवसेनेला पटकवणारा जन्माला यायचाय, उद्धव ठाकरेंचा अमित शहांना इशारा

शिवसेनेला पटकवणारा जन्माला यायचाय, उद्धव ठाकरेंचा अमित शहांना इशारा

मुंबई : "" शिवसेनेला पटक देणारा अद्याप जन्माला यायचा आहे, आम्हाला लेचेपेचे समजू नका असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिला आहे. 

शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही महिन्यापासून कलगितुरा सुरू आहे. काही दिवसापूर्वी शहा यांनी शिवसेनेबरोबर युती झाली तर ठिक अन्यथा शिवसेनेको पटक देंगे असा इशारा दिला होता. शाह यांना आज ठाकरेंनी उत्तर दिले आहे. मुंबईत स्थानिक लोकाधिकार समितीच्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, की शिवसेनेसाठी देश महत्त्वाचा आहे. आम्ही लेचेपेचे नाहीत. आम्हाला पटकणारा जन्माला यायचा आहे. देशात कोणतेही लाट येऊ दे. लाटांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही. 

ठाकरे म्हणाले, ''शिवसेनेमुळे मराठी माणसाला ताकद कळाली. आम्हाला लेचपेच समजण्याची चूक करू नका. घोषणेतला फोलपणा दाखविणे म्हणजे टीका करणे नव्हे. युती झाली तर कुणाच्या जागा वाढतील. निवडणुकीत जय पराजयापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे. देश किती पुढे याईल यात रस नाही. कर्जमाफीचा आम्ही पर्दाफाश केल्यामुळे सरकारकडून सरकार मजबूर असले तरी देश मजबूत असले पाहिजे. शिवसेनेला स्वतःची नाही तर देशाची चिंता आहे. निवडणुका देव, देश आणि धर्मासाठीच लढल्या पाहिजेत.'' 

निवडणुकीसाठीच राम मंदिराचा मुद्दा 
राम मंदिराचा मुद्दा जुमला आहे का? राम मंदिर हा न्यायालयाचा विषय होता, मग मते का मागितली. त्यामुळेच राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच घेतला आहे, असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com