स्वस्त धान्य वितरणावर लक्ष ठेवा; शिवसेना भवनातूनच निघाले आदेश

शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना धान्य वाटप होते की नाही याकडे जिल्हा प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देवून पाहणी करावी. तसेच त्याचा अहवाल शिवसेना भवनाला सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिवसेना भवनातून देण्यात आले आहेत
Shivsena Asks Party Workers to Keep Watch on Ration Shops
Shivsena Asks Party Workers to Keep Watch on Ration Shops

लातूर : शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्य वितरण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना धान्य वाटप होते की नाही याकडे जिल्हा प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देवून पाहणी करावी. तसेच त्याचा अहवाल शिवसेना भवनाला सादर करावा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिवसेना भवनातून देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आता कामाला लागले आहेत.

सध्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात आणि राज्यात लॉक डाऊन सुरू आहे. या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी राज्य सरकारने धान्य वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

पालकमंत्री अमित देशमुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात

याबाबत पालकमंञी अमित देशमुख हे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून शहरी आणि ग्रामीण भागातील व्यवस्थेवर लक्ष देऊन आहेत. काही ठिकाणी अजूनही ही नागरिकांना धान्य मिळाले नसल्याच्या तक्रार येत असून स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरणामध्येकाही गडबड आढळल्यास तात्काळ तक्रार दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. 

जिल्हाभरात असलेल्या वितरण व्यवस्थेवर जिल्हाप्रमुखांसह तालुकाप्रमुख ,विभाग प्रमुख ,शाखाप्रमुख यांनी लक्ष द्यावे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून शिवसेना भवनातून जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.  जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातून गरजूंना धान्याचे वाटप होत आहे की नाही, हे पहावे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आणि स्वस्त धान्य दुकान चालकांनी कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता सर्वसामान्य नागरिकांना ठरवून दिलेल्या नियमानुसार धान्य वितरण करावे, अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल देण्यात येणार आहे. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन परिस्थितीत नागरिकांना दोन घास मिळावे हीच सरकारची भूमिका आहे. यामध्ये गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com