शिवसेनेचा वर्धापन दिन : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी कामाला लागण्याचा आदेश उद्धव ठाकरे देणार?

शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19 ) येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधींना मार्गदर्शन करणार आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपास्थित राहणार आहेत.
शिवसेनेचा वर्धापन दिन : आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी कामाला लागण्याचा आदेश उद्धव ठाकरे देणार?

मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19 ) येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधींना मार्गदर्शन करणार आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपास्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच वर्धापन दिनानिमित्ताने मार्गदर्शन करणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीबाबतची आपली भूमिका उद्धव स्पष्ट करणार असल्याचे समजते आहे. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा चंग शिवसेनेने बांधल्यामुळे आक्रमकपणे कामाला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे उद्याच्या मेळाव्यातून देणार आहेत.शिवाय ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा,शेतकरी आणि शेतमजूरांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी यावर ही उद्धव मार्गदर्शन करणार आहेत.

उद्धव ठाकरे नुकतेच अयोध्येवरून आले आहेत. अयोध्येतून त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा नारा बुलंद केला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना हिंदुत्वाचं कार्ड वापरणार का हे देखील उद्या स्पष्ट होणार आहे. शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला मिळालेल्या अवजड उद्योग खात्यावर ही उद्धव हे नाराज आहेत. यावर उद्धव नेमकं काय बोलणार याकडे ही शिवसैनिकांचं लक्ष लागले आहे. 

उद्धव यांच्याबरोबरच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले,औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे देखील उपास्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते,लोकप्रतिनिधी,पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com