शिवसेनेची तुरंबे फाटा येथे गुरुवारी ऊस परिषद

शिवसेनेची तुरंबे फाटा येथे गुरुवारी ऊस परिषद

कोल्हापूर : शिवसेनेतर्फे गुरुवारी (ता. 21) ऊस परिषद होत आहे. यंदाच्या हंगामातील "एफआरपी', तसेच मागील देणे देण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे. गणपती मंदिर, तुरंबे फाटा (ता. राधानगरी) येथे दुपारी चार वाजता परिषदेस सुरवात होईल. शिवसेनेची यंदाची ही तिसरी ऊस परिषद आहे. 
उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, अविनाश शिंदे, उत्तम पाटील, अशोक पाटील, अरविंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत संयुक्तपणे ही माहिती दिली. जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार प्रकाश आबिटकर, मारुतराव जाधव यांच्या उपस्थितीत ही परिषद होत आहे. 

2019-20 या गळीत हंगामातील उसाच्या प्रतिटन दराची मागणी केली जाणार आहे. तोड, शेतमजूर, पूरस्थिती व परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान, शेतकरी व शेतमजुरांचे निवृत्तिवेतन, केंद्रसरकारचे अनुदान यासंबंधी ठराव मांडले जाणार आहेत. 
जिल्ह्यात एक लाख 55 हजार 584 हेक्‍टर इतके उसाचे क्षेत्र आहे. पैकी आडसाली क्षेत्र 25 हजार 683 पूर्वहंगामी 34 हजार 339 सध्याचे 26 हजार 676 हेक्‍टर तसेच खोडव्याचे 68 हजार 96 हेक्‍टर उसाचे क्षेत्र आहे. यंदा उसाची लागवड चांगली झाली. महापूर आणि अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले. महापुरामुळे नदीकाठचा ऊस कुजून गेल्याने हजारो कोटींचे नुकसान झाले. पिकांची नुकसानभरपाई मिळालेली नाही. विजेचे वाढलेले दर, महागलेले बी- बियाणे, वाढीव पाणीपट्टी यामुळे एफआरपी मिळूनही शेतकरी कर्जाच्या खाईत गेला. यासंबंधी धोरण ठरविण्यासाठी ही परिषद होत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com