आंदोलन तेलगू खासदारांचे...नेतृत्व शिवसेनेचे !!!

आंदोलन तेलगू खासदारांचे...नेतृत्व शिवसेनेचे !!!

नवी दिल्ली : कायदा झाल्यावर तीन वर्षांनीही रूळावर येत नसलेल्या वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) राज्यांना मिळणारा न्याय्य वाटा केंद्रातील मोदी सरकार देत नसल्याबद्दल विविध राज्यांच्या खासदारांत संतप्त भावना आहे. याच मागणीसाठी आज संसद परिसरात तेलंगणा राष्ट्र समितीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली...मात्र त्यांचे नेतृत्व करणारांत चक्क एक शिवसेना खासदारही असल्याचे दिसून आले....विनायक राऊत हे त्यांचे नाव. 

जीएसटीचा मोबदला व कर परताव्याची केंद्राकडून राज्यांना मिळणारी कोट्यवधी रूपयांची रक्कम थकित आहे. ती लवकरात लवकर मिळावी यासाठी टीआरएसच्या खासदारांनी आज सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी महात्मा गांधी पुतळ्यासमोर घोषणाबाजी केली व केंद्राच्या दिरंगाईचा निषेध केला. याच मागणीसाठी शिवसेना खासदारही आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात फक्त राऊत वेळेवर आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी सरळ टीआरएसच्या खासदारांमध्ये जाऊन घोषणाबाजी सुरू केली व एका वेळी तर तेच नेतृत्व करत असल्याचे दिसून आले. 

आधी टीआरएसचे खासदार केंद्र सरकार म्हणत होते त्यात राऊत यांनी मोदी सरकारचे नाव घेऊन आक्रमकपणे घोषणा दिल्या व आंदोलकांचे नेतृत्वही केले. काही मिनिटांनी तेथे आलेले धौर्यशील माने वगळता एकही शिवसेना खासदार आंदोलनस्थळी आले नाहीत. दरम्यान राऊत म्हणाले की जीएसटीच्या परताव्याची राज्य शासनास मिळणारी 15 हजार 558 कोटी 5 लाख रूपये येणे बाकी आहे. ही थकित रक्कम राज्याला त्वरित मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे. अर्थव्यवस्थेची मंदी लक्षात घेता यापुढेही महाराष्ट्राला कर परतावा कमी मिळण्याची चिन्हे आहेत. चालू आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला केवळ 5 हजार 635 कोटींचाच जीएसटी परतावा मिळाला आहे. पूर्ण परतावा मिळाला तर ठाकरे सरकारला राज्यातील विकासकामांना वेग देता येणे शक्‍य होणार आहे असेही राऊत यानी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com