अदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेला हवे आहे महसूल खाते...

अदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेला हवे आहे महसूल खाते...

पुणे : राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना शिवसेनेच्या मनात नेमके काय याची चर्चा राज्यभर सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासह सत्तेची अर्धी वाटणी ही शिवसेनेची प्रमुख मागणी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पार्टीवर दबाव आणून उपमुख्यमंत्री व महसूल तसेच अर्थ व नगरविकास यासारखी महत्वाची खाती पदरात पाडून घेण्याची शिवसेनेची योजना असल्याचे शिवसेनेतील विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपा मान्य करणार नाही याची कल्पना सेना नेतृत्वाला आहे. मात्र, या पदाच्या माध्यमातून इतर महत्वाची खाती मिळविण्यासाठी सेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा दबाव जाणीवपूर्वक आणला जात असल्याचे सेनेचे नेते खासगीत सांगत आहेत. शिवसेनेचा युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देताना महसूलसारखे महत्वाचे खाते असावे, अशी यामागची शिवसेनेची रणनिती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजपा सुरवातीपासूनच तयार आहे. मात्र, सेनेला नगरविकास, महसूल व अर्थ ही महत्वाची खाती हवी आहेत. मुख्ममंत्रीपद तसेच गृहखाते भाजपा सोडणार नाही याची कल्पना असल्याने गृहखात्याचा आग्रह सेनेने सोडलेला आहे. मात्र, दबावाच्या राजकारणाचा भाग म्हणून अजूनही मुख्यमंत्रीपद व सत्तेची समान वाटणी या मुद्यावर ठाम असल्याचे दाखवण्यात येत असल्याचे या नेत्याने सांगितले. 

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन रविवारी आठ दिवस पूर्ण झाले. मात्र, सरकार स्थापनेबाबत अद्यापी नेमके चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांबरोबरच नवनिर्वाचित आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. सत्तेचा हा तिढा लवकर सुटावा, अशी भावना शिवसेनेच्या आमदारांचीही आहे. राज्यातील जनतेत असंतोष वाढू नये, याची काळजी भाजपाबरोबरच शिवसेनेलाही घावी लागणार असल्याने येत्या चार दिवसात सरकार स्थापन करणे आवश्‍यक असल्याची जाणीव दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी असल्याचे या नेत्याने सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com