शिवसेनेचा राजमार्ग नांदेडमधूनच...२०१४ ची पुनरावृत्ती होणार का?

गेल्या वेळेस २०१४ मध्ये शिवसेनेचा सत्तेचा राजमार्ग नांदेडमधून सुरु झाला होता. त्यानंतर आता २०१९ मध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अजून सुटला नसतानाच मंगळवारी (ता. पाच) शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत सेनेचे ज्येष्ठ नेतेमंडळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटून गेले. आता पुन्हा एकदा २०१४ सारखा प्रयोग होणार का? आणि शिवसेना सत्तेत सहभागी होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Devendra Fadanavis - Uddhav Thakray
Devendra Fadanavis - Uddhav Thakray

नांदेड :  गेल्या वेळेस २०१४ मध्ये शिवसेनेचा सत्तेचा राजमार्ग नांदेडमधून सुरु झाला होता. त्यानंतर आता २०१९ मध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अजून सुटला नसतानाच मंगळवारी (ता. पाच) शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत सेनेचे ज्येष्ठ नेतेमंडळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटून गेले. आता पुन्हा एकदा २०१४ सारखा प्रयोग होणार का? आणि शिवसेना सत्तेत सहभागी होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मागील निवडणुकीत २०१४ मध्ये आघाडी किंवा युती झाली नव्हती. सर्वजण स्वबळावर लढले होते. भाजपने सर्वात जास्त १२३ जागा मिळवत सत्ता मिळवली. शिवसेनेने विरोधी पक्षात बसणे पसंद केले आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते तसेच इतर ज्येष्ठ नेते नांदेडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी २०१४ मध्ये कोरडा दुष्काळ होता. त्यांनी लोहा मतदारसंघात तत्कालीन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत दौरा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले आणि काही दिवसातच शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. त्यामुळे नांदेडमधूनच सत्तेचा राजमार्ग सेनेला मिळाला असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती.

आता २०१९ च्या निवडणुका झाल्या असून त्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी शिवसेना किंवा इतर पक्षांच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करु शकत नाही. त्यामुळे आता काय होणार? याची उत्सुकता असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. पाच) नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. गेल्या वेळेस २०१४ ला कोरडा तर आता २०१९ मध्ये ओला दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसानीची त्यांनी पाहणी केली आणि त्यांना धीर दिला. लोहा आणि कंधार तालुक्यातील गावांना भेटी देऊन ते लातूरकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, अनिल देसाई, दीपक केसरकर, मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत खैरे, जयदत्त क्षीरसागर, अब्दुल सत्तार, बालाजी कल्याणकर आदी उपस्थित होते.

नांदेडचा दौरा आटोपून लातूरमार्गे श्री. ठाकरे मुंबईला रवाना झाले आहेत. आता दोन दिवसात सरकार बनणार का? याचा निर्णय होणार असून त्यात शिवसेना सहभागी होणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. नांदेडमध्ये २०१४ मध्ये जे घडले तसेच २०१९ मध्ये घडणार का? आणि शिवसेनेचा राजमार्ग पुन्हा एकदा नांदेडमधून जाणार का? याची चर्चा सुरु झाली असून ते पाहण्यासाठी दोन दिवसांची वाट पहावी लागणार आहे. पुन्हा एकदा २०१४ सारखा प्रयोग होऊन शिवसेना सत्तेत सहभागी होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com