अमित शहांना टोचण्याची ताकद फक्त ठाकरे बंधूंतच!

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यांतील राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस असे दोन्हीपक्ष खच्ची केले. त्याचापरिणाम म्हणून या पक्षांतील नेते भाजपच्या आश्रयासाठी धावपळ करत आहेत. शहा यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत सहसा कोणी दाखवत नाहीत. याला अपवाद दोन नेत्यांचा. उद्धव आणि राज ठाकरे!
अमित शहांना टोचण्याची ताकद फक्त ठाकरे बंधूंतच!

पुणे : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी अमित शहा हे डबल ढोलक असल्याची केली होती. या टिकेबद्दल शिवसेनेने `सामना` च्या अग्रलेखात कौतुक केले. या निमित्ताने अमित शहांना अंगावर घेण्याची ताकद फक्त `ठाकरें`मध्येच  असल्याचे दिसून आले आहे.

अमित शहा हे देशातील क्रमांक दोनचे राजकीय नेते आता बनले आहेत. भाजपकडे सर्व सत्तास्थाने असल्याने तसेच ईडी, सीबीआय यांच्या कारवाईचा धसका असल्याने त्यांच्याविरोधात थेट कोणी बोलत नाही. इतरांनी टीका केली तरी ती वरवरची असते. त्या त्या राज्यातील प्रस्थापित नेतृत्त्वाला खच्ची करण्याचे अमित शहांचे धोरण असते. मग ते पश्चिम बंगालमध्ये ममता किंवा महाराष्ट्रात शरद पवार असोत. त्यांच्यावर हल्ले चढवून त्यांची ताकद कमी करण्याची शहा यांची रणनीती आतापर्यंत चांगलीच यशस्वी झाली आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, असा प्रश्न विचारून सोलापूरच्या सभेत टीका केली होती. 

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेलाही शहा यांनी जे पक्ष सोबत येणार नाहीत त्यांना `पटक देंगे`,असा इशारा दिला होता. हा शिवसेनेसाठी निर्वाणीची इशारा होता.  शिवसेनेने राजकीय अपरिर्हता म्हणून युती केली. पण शहा यांना मातोश्रीवर यायला भाग पाडले. शहा यांच्या उपस्थितीतच लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही जागावाटपाचे सूत्र ठऱल्याचे सांगण्यात येते.

आता शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही याबाबत चर्चा सुरू असताना शिवसेनेने परत एकदा शहांवर निशाणा साधला आहे.  रोहित पवार यांच्या टिकेला पुढे करून भाजपवर तीर मारण्याची संधी साधली. अग्रलेखात पवारांच्या चौथ्या पिढीने अमित शहा यांना चोख उत्तर दिल्याचे नमूद केले असून, रोहित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नांना बेदखल करता येत नाही अशा शब्दात रोहित पवार यांचे प्रश्न बरोबर असल्याचं प्रशस्तीपत्रही `सामना`ने दिले.

राज्यातील 2014 च्या निवडणकीत शहा यांची अफलजलखान म्हणून शिवसेनेने शरसंधान चढविले होते. वेळीच `शहा`णा म्हणून मोहीमही चालवली होती.   सध्या देशात मंदी असल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी मोदी सरकारने माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा सल्ला घ्यावा, अशीही सूचना दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने दिली होती.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तर शहा यांची संभावना `दाढीवाल्यां`त केली होती. हे दोन दाढिवाले नकोत, असाच प्रचार त्यांनी केला होता. त्यांच्या प्रचाराला लोकसभा निवडणुकीत प्रतिसाद मिळाला. पण त्याचे रूपांतर मतांत झाले नाही. त्यानंतर राज यांच्या विरोधात ईडीची कारवाई नुकतीच सुरू झाली, हा देखील योगायोग मानायला हवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com