बंडोबांना शमविण्यासाठी दोन्ही पक्षाचे प्रयत्न ; बैठकामागून बैठका

 बंडोबांना शमविण्यासाठी दोन्ही पक्षाचे प्रयत्न ; बैठकामागून बैठका

औरंगाबाद : जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवारांविरोधात भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज सादर केले आहे. हे बंडोबा महायुतीतील अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी ठरत आहे. यांचा शांत करण्यासाठी रविवारी दोन्ही पक्षांची सकाळी बैठक झाली आहे. या बैठकीत तोडगा न निघाल्याने पुन्हा सायंकाळी चार वाजेदरम्यान बंडखोरांच्या उपस्थितीत बैठक ठेवण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्‍ते शिरीष बोराळकर यांनी दिली. 

भाजप-शिवसेनेतर्फे राज्यातील 288 जागांवर स्वतंत्रपणे तयारी केली होती. युती तुटेल याच अशेने अनेकांनी तयारी केली होती. जिल्ह्यातील 9 मतदारसंघातही अनेकांनी तयारी केली होती. युती झाल्यामुळे जिल्ह्यातील औरंगाबाद मध्य, पश्‍चिम, सिल्लोड, कन्नड, पैठण आणि वैजापूर हे मतदारसंघ शिवसेनेला सुटले आहेत . तर औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर हे तीन मतदारसंघ भाजपला सुटले आहेत. भाजपच्या पूर्व आणि फुलंब्रीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंड करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तर शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या शहराध्यक्ष,जिल्हाध्यक्ष ते पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी शमविण्यासाठी दोन्ही पक्षातर्फे बोलणी सुरु आहे. 

याच संदर्भात भाजपच्या जिल्हा कार्यालयात शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार संजय सिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले तर भाजपतर्फे प्रदेश प्रवक्‍ते शिरिष बोराळकर आणि मराठवाडा संघटक भाऊराव देशमूख यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षातील बंडखोरांची यादी एकमेकांसमोर ठेवण्यात आली. यात माघारी घेण्या विषयी बरीच गुप्तपणे चर्चा झाली. या बैठकीनंतर आता भाजप स्वतंत्रपणे बंडखोरी केलेल्यांची चार वाजता बैठक घेणार आहेत. याच बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचेही बोराळकर यांनी सांगितले. 

यांनी केली बंडखोर 
- औरंगाबाद पूर्व मधून महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या विरोधात शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक रेणुकादास वैद्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
- मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात भाजपचे शहराध्यक्ष किशनंचद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
-पश्‍चिम मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय सिरसाट यांच्या विरोधात नगरसेवक राजू शिंदे आणि भाजप शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे. 
----- 
-फुलंब्री मतदारसंघातून भाजपतर्फे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे 
-------- 
- सिल्लोड मतदारसंघाची भाजपची जागा युती मध्ये शिवसेनेला सोडण्यात आली. येथून शिवसेनेतर्फे अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यांच्या विरोधात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील मिरकर यांनी अर्ज दाखल केला आहे. 
----- 
पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे संदीपान भूमरे यांच्या विरोधात भाजप मध्ये प्रवेश केलेले, पैठण विधानसभा अध्यक्ष कल्याण गायकवाड,कांचन चाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
-------- 
कन्नड मधून शिवसेनेतर्फे उदयसिंग राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार यांच्यासह राजू राठोड आणि संजय गव्हाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
------- 
वैजापुरात शिवसेनेला रमेश बोरनारे यांच्या विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आणि डॉ. दिनेश परदेशी यांनी बंडखोरी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com