shivsena and bjp alliance | Sarkarnama

सावंत अजूनही केंद्रीय मंत्रिमंडळात, त्यामुळे युतीत चर्चा शक्‍य...

संपत मोरे
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पुणे : शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राज्यात जुंपली आहे. भाजप शिवसेना युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी इतक्‍या राजकीय घडामोडींनंतरही राजीनामा दिला नसल्याने आणि त्यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनेकडून अद्याप काहीही बोलले गेले नसल्याने उद्धव ठाकरे यांनी अजूनही भाजपसोबत चर्चेसाठी जागा ठेवली आहे असे मानले जात आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा संजय राऊत यांनीच भाजपला घायाळ केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून रोज ते टिका करत आहेत. या टिकेदरम्यान "मुख्यमंत्रीपद आमच्याकडे' ही भूमिका त्यानी ठामपणे लावून धरली आहे. त्यांनी रोज मुख्यमंत्री आणि भाजपावर टिका करून मरगळ आलेल्या शिवसेनेत चैतन्य निर्माण केले. 

उभयपक्षाकडून संवादाचे मार्ग बंद झाल्याचे चित्र दिवसेंदिवस तयार होत गेले. महायुती सत्तेवर येऊनही राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सरकार स्थापन होऊ शकले नाही असे भाजपचे नेते सांगत आहेत. सरकार स्थापन करायला असणारे संख्याबळ महायुतीकडे आहे मात्र मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे यावरून जोरदार खडाजंगी सुरू आहे. फडणवीस आणि ठाकरे या दोन नेत्यांच्या पत्रकार परिषदा झाल्या मात्र त्यामध्ये या दोन पक्षात संवाद होईल असे दोन्हीकडून बोलले गेले नाही.त्यामुळे महायुतीतील या पक्षाचा संवाद बंद आहे. 

केंद्रात अवजड उद्योग मंत्री असलेले शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी अजूनही मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांना अद्यापही राजीनामा देण्याबाबत शिवसेनेकडून सांगण्यात आलेले नाही. जोवर सावंत राजीनामा देत नाहीत तोवर युती तुटली अस म्हणता येणार नाही. सावंत यांचा राजीनामा न घेऊन ठाकरे यांनी भाजपशी चर्चा करायला जागा ठेवली आहे असेही सांगण्यात येत आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख