shivsena and bjp active in mangalvedha | Sarkarnama

मंगळवेढ्यात युती होण्याआधीच भाजप व सेनेची मोर्चेबांधणी

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

मंगळवेढा : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास काही दिवसांचा अवधी असताना राज्यात भाजप व शिवसेनेची युती झाल्याचे अदयापही जाहीर केले नसले तरी विधानसभा डोळयावर ठेवून पंढरीच्या नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांच्या युतीत ही जागा शिवसेनेला की भाजपला मिळणार मिळणार हे ठरण्याच्या आधीच दोन्ही बाजूंनी मोर्चेबांधणी सुरू आहे.

मतदारसंघांच्या 2009 मध्ये झालेल्या पुनर्रचनेनंतर मंगळवेढा -मोहोळ  मतदारसंघाचे अस्तित्व संपवून मंगळवेढा- पंढरपूर असा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्यातून मंगळवेढयात पंढरीच्याच नेत्यांचा बोलबाला वाढला.

अशा परिस्थितीत 2009 साली ही जागा शिवसेनेकडे होती. त्यावेळी यात तीन हजारपेक्षा अधिक मते मिळाली. पण 2014 साली शिवसेना व भाजपा स्वबळाबर लढताना भाजपने ही जागा स्वाभिमानीकडे दिली. स्वाभिमानीचे उमेदवार प्रशांत परिचारक 90 हजारांपेक्षा अधिक मते घेतली. शिवसेनेच्या समाधान आवताडेंनी 40 हजार मते घेतली.

आमदार परिचारक हे सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. तर शिवसेनेतून निवडणूक लढविलेले सध्या समाधान आवताडे हे पक्षापासून अंतर ठेवून असल्याने शैला गोडसे यांनी जोर धरला आहे. मंगळवेढयातील विविध आंदोलन व कार्यक्रमास भेटी देत संपर्क वाढविला आहे. गत निवडणुकीत थोडक्या मताने पराभव झालेल्या परिचारकांना यंदा ढोबळे भाजपात आल्यामुळे निर्णायक मतासाठी फायदा होणार आहे.

परिचारक यांनी मुख्यमंत्रयाचा संबंधाचा लाभ घेत मोठया प्रमाणात निधी मिळवला. पण मंगळवेढयातील रस्ते व अन्य योजनेसाठी मिळविताना पाण्याबाबत त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. विधानसभेच्या आखाडयात कोणते परिचारक उतरतात याची उत्सुकता राहणर आहे. 

दुसरीकडे  शैला गोडसे यांनी संपर्कावर भर दिला. पंढरपूर व मंगळवेढ्यात 51 शाखा काढून पक्षीय बांधणी सुरू केली. त्यांना आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ परिवाराची साथ मिळणार आहे. पण ही जागा युतीत शिवसेनेला जागा मिळाली तर परिचारक गट कोणती भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख