युतीचा पोपट मृत्युमुखी, अखेर भाजपकडूनही शिक्कामोर्तब !

युतीचा पोपट मृत्युमुखी, अखेर भाजपकडूनही शिक्कामोर्तब !

नवी दिल्ली : भाजप-शिवसेना युतीच्या संसारावर विधानसभा निवडणूक निकालानंतर लागलेल्या ग्रहणावर सत्तारूढ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आज अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही युती तुटली असे थेट न सांगता, शिवसेना खासदारांसाठी विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था केली जात आहे असे सांगून युतीचा पोपट मृत्युमुखी पडल्याचे सुस्पष्ट केले. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत बैठकांचा धडाका सुरू झाल्यावर आज सकाळी प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी, सुदीप बंडोपाध्याय सतीश मिश्रा, नवनीत कृष्णन रामदास आठवले अनुप्रिया पटेल, चिराग पास्वान आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह सर्वपक्षीय नेते आजच्या सकाळच्या बैठकीला उपस्थित होते. 

या बैठकीनंतर जोशी यांना पत्रकारांनी घेरले. शिवसेनेबरोबरच्या युतीचे काय या एकाच प्रश्नावर सगळा गलका झाला. त्यावर जोशी यांनी युती तुटली हा शब्द ओठांवर येऊ दिला नाही. मात्र ते म्हणाले की ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेनेचा सदस्य नव्हता. शिवसेना सदस्य कालच्या रालोआच्या बैठकीलाही उपस्थित नव्हते. जोशी म्हणाले की एनडीएच्या बैठकीलाही ते (शिवसेना) आले नाहीत. केंद्रातील त्यांच्या मंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे त्यांच्यासाठी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी बाकांवर बसण्याची व्यवस्था केली जात आहे. जोशी यांच्या उत्तरानंतर भाजपची शिवसेनेबरोबरची सर्वात जुनी युती तुटली यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com