शिवसेनेलासुध्दा युतीची गरज होतीच, आता जागा वाढतील : एकनाथ खडसे

''यापूर्वी भाजपच्या बैठकीत शिवसेनेशी युती करू नये, असा निर्णय झाला. तो फक्त मी जाहीर केला होता. त्यात माझी काहीच भूमिका नव्हती. यावेळी शिवसेनेलासुध्दा युतीची गरज होतीच. त्याप्रमाणे युती झाली. आता लोकसभेच्या जागा वाढतील," असा दावा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे केला.
शिवसेनेलासुध्दा युतीची गरज होतीच, आता जागा वाढतील : एकनाथ खडसे

नाशिक : ''यापूर्वी भाजपच्या बैठकीत शिवसेनेशी युती करू नये, असा निर्णय झाला. तो फक्त मी जाहीर केला होता. त्यात माझी काहीच भूमिका नव्हती. यावेळी शिवसेनेलासुध्दा युतीची गरज होतीच. त्याप्रमाणे युती झाली. आता लोकसभेच्या जागा वाढतील," असा दावा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे केला.

भाजप - शिवसेना महायुतीचा नाशिक विभागाचा पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मेळावा येथे झाला. यावेळी ते उपस्थित होते. ते म्हणाले, ''मागच्या लोकसभा निवडणुकीत आमची युती होती. त्यात उत्तर महाराष्ट्रात सहा जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत युती नको, अशी भूमिका भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आली. तो सामुहिक निर्णय होता. तो फक्त मी जाहीर केला. त्यात माझा वैयक्तिक काहीही संबंध नव्हता. आता युती झाली आहे."

"मी गेली चाळीस वर्षे सार्वजनिक जीवनात आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम उभे केले. उत्तर महाराष्ट्र हा युतीचा बालेकिल्ला आहे. तो अधिक मजबूत झाला. संघटनेची पाळेमुळे मजबूत झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे करण्यासाठी हे सरकार आवश्यक आहे. राज्यात सत्ता आहे. ती पुन्हा सत्तेत हवी आहे असे लोकांना वाटते. त्यामुळे वातावरण चांगले आहे." असेही खडसे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com