शिवसेनेने ठोकली इस्लामपूर पालिकेच्या आवारात 'बोंब!', 

चुकीच्या पद्धतीने केलेली संकलित कर वाढ पूर्णता रद्द व्हावी यासाठी शहर शिवसेनेने आज पालिकेच्या आवारात शंखध्वनी आंदोलन केले.अन्यायकारक करवाढ रद्द झालीच पाहिजे, बेकायदेशीर सुनावणी रद्द झालीच पाहिजे, जनतेला वेठीस धरणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध असो, मनमानी कारभाराचा धिक्कार असो, पालिका प्रशासन हाय हाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या
Shivsena Agitation aginst Tax in Islampur Corporation
Shivsena Agitation aginst Tax in Islampur Corporation

इस्लामपूर : चुकीच्या पद्धतीने केलेली संकलित कर वाढ पूर्णता रद्द व्हावी यासाठी शहर शिवसेनेने आज पालिकेच्या आवारात शंखध्वनी आंदोलन केले. नगरसेवक व शहर शिवसेनेचे अध्यक्ष शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. पालिका प्रशासनाच्या विरोधात शिवसैनिकांनी पालिकेच्या आवारात 'बोंब' ठोकली.

अन्यायकारक करवाढ रद्द झालीच पाहिजे, बेकायदेशीर सुनावणी रद्द झालीच पाहिजे, जनतेला वेठीस धरणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध असो, मनमानी कारभाराचा धिक्कार असो, पालिका प्रशासन हाय हाय अशा घोषणा दिल्या

यावेळी बोलताना शकील सय्यद म्हणाले, "सत्तेत असताना शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागणे दुर्दैव आहे. पालिका प्रशासनाने गेली १२ वर्ष संकलित कराची वाढ केलेली नाही. पालिका अँक्टनुसार दर चार वर्षांनी मालमत्तेचा सर्वे करून करवाढ करणे गरजेचे होते. चुकीच्या पद्धतीने मनमानी करत एका खाजगी कंपनीला सर्वे करण्याचा ठेका दिला. आधी नोटीस मग बिल दिले आहे. काहींना आज बिले मिळालीत. प्रशासनाने मालमत्ताधारकाना तक्रार करण्यासाठी कमी मुदत दिली. सुमारे चाळीस टक्के नागरिकांना अद्याप नोटिसाच मिळालेल्या नसतानाही सुनावणी सुरू केली आहे. कर मुल्याकंन अधिकारी यांनी ठरवलेल्या दरातही चुका आहेत." 

ते पुढे म्हणाले, "सर्व्हे चुकीचा झाल्याने तो पुन्हा करावा. आकारणी अव्वाच्या सव्वा झालीय, ती कशाच्या आधारावर केलीय याचा खुलासा करावा. आमचा करवाढीला विरोध नाही, पण बिलातील चुका आम्हाला मान्य नाहीत. अदा केलेले बिल पुन्हा समाविष्ट होणार आहे का? तसे असल्यास तिप्पट, चौपट आकारणी होईल, आम्हाला ती अमान्य आहे. सतरा हजार तक्रारी आहेत, त्या सर्वांचे प्रोसिडिंग होणार काय? नसेल तर जनतेला का वेठीस धरले जात आहे? हा कारभार बंद करावा. पक्के बिल देताना दुरुस्त्या होणार आहेत का, हे लेखी सांगावे, अन्यथा शिवसेनेचा खरा उद्रेक आपणाला दिसेल." 

राजेद्र पवार, सचिन सरनोबत, सागर मलगुंडे, परशुराम बामणे, सुभाष ऐवळे, संतोष कदम, दिपक जाधव, योगेश हुबाले, कृष्णात पाटील, राहुल टीबे, निशिकांत लोहार, वर्षा निकम, लक्ष्मण निकम, ज्ञानदेव पाटील, सागर कोळेकर, रोहीत नाझरे, कपील पवार, दिलीप सुतार अशोक कुचिवाले, लाला गुरव, अनंत नाईक यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

पालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे. चुकीचे काही होणार नाही. शिवसेनेच्या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल. बिलांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होईल. बिलांमधील चुकीची दुरुस्ती करू -  प्रज्ञा पवार-पोतदार, मुख्याधिकारी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com