शिवसेनेला हवे पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद? राऊत पवारांच्या भेटीला

शिवसेनेने भाजपवरचा आपला दबाव वाढवायला सुरुवात केली असून आपणाला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी शिवसेना करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच सर्व महत्त्वाच्या खात्यांवरही शिवसेना दावा सांगणार आहे. भाजपवरच्या दबावतंत्राचा भाग म्हणून शिवसेना नेते संजय राऊत आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
BJP Sena
BJP Sena

मुंबई : शिवसेनेने भाजपवरचा आपला दबाव वाढवायला सुरुवात केली असून आपणाला पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी शिवसेना करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच सर्व महत्त्वाच्या खात्यांवरही शिवसेना दावा सांगणार आहे. भाजपवरच्या दबावतंत्राचा भाग म्हणून शिवसेना नेते संजय राऊत आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. 

राज्यात २४ आॅक्टोबरला मतमोजणी झाल्यानंतर आजपर्यंत सरकार स्थापन झालेले नाही. शिवसेना व भाजपमध्ये ५०-५० या फाॅर्म्युलामुळे पेच निर्माण झाला आहे. एकीकडे मुख्यमंत्रीपदासाठी ठाम राहण्याचे भाजपने ठरवले असले तरीही शिवसेनाही मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम आहे. अडीच वर्षांसाठी आणि तेही पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रीपद आपणाकडे असावे, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मित्रपक्षांना द्यायच्या जागाही भाजपने आपल्या कोट्यातूनच द्याव्यात, असेही शिवसेनेचे म्हणणे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com