शिवसेनेच्या "मी कर्जमुक्त होणार' अभियानाला सुरुवात - shivsena abhiyan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

शिवसेनेच्या "मी कर्जमुक्त होणार' अभियानाला सुरुवात

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 जून 2017

शिवसेनेचे आमदार, नेते, पदाधिकारी व शिवसैनिक गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांची माहिती स्वाक्षरीसह भरून घेणार आहेत. प्रत्येक तालुक्‍यातून किमान एक लाख अर्ज भरून घेण्याचे उदिष्ट शिवसैनिकांना देण्यात आले आहे. त्यासाठी 15 जूनची मुदत निर्धारित करण्यात आली असून 19 जून रोजी हे सर्व अर्ज एकत्रित करून मुंबईला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येतील.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपामुळे वातावरण चिघळलेले असतानाच शिवसेनेने शिवसंपर्कच्या माध्यमातून "मी कर्जमुक्त होणार' अभियानाला औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवात केली आहे. 1 ते 19 जून दरम्यान या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांशी चर्चा करून जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदासंघनिहाय "मी कर्जमुक्त होणार' या मोहिमेसाठीचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. 

औरंगाबाद येथे झालेल्या आढावा बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी "मी कर्जमुक्त होणारच' ही मोहीम राज्यभरात राबवणार असल्याची घोषणा केली होती.

1 जूनपासून शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे आमदार, नेते, पदाधिकारी व शिवसैनिक गावागावात जाऊन शेतकऱ्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांची माहिती स्वाक्षरीसह भरून घेणार आहेत. प्रत्येक तालुक्‍यातून किमान एक लाख अर्ज भरून घेण्याचे उदिष्ट शिवसैनिकांना देण्यात आले आहे.

त्यासाठी 15 जूनची मुदत निर्धारित करण्यात आली असून 19 जून रोजी हे सर्व अर्ज एकत्रित करून मुंबईला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येतील. त्यानंतर राज्यभरातून आलेले शेतकऱ्यांचे "मी कर्जमुक्त होणार' चे अर्ज शिवसेनेचे नेते, मंत्री व आमदारांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना देण्यात येतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख