शिवसेनेच्या सर्व नेत्यांची आज 'मातोश्री'वर बैठक

शिवसेनेच्या सर्व नेत्यांची आज 'मातोश्री'वर बैठक

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या बदललेल्या भूमिकेबाबत काय निर्णय घ्यायचा या संभ्रमात सध्या शिवसेना आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्‍यता लक्षात घेता रणनीती ठरवण्यासाठी आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलविली आहे. 
"मातोश्री' या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. 

सध्याच्या राजकीय परिस्थितीत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून भाजप शिवसेनेशिवाय सरकार बनवण्याच्या हालचाली करत आहे. त्यामुळे सरकारमधील सेनेच्या भूमिकेबद्घल चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलविली असल्याचे सांगण्यात येत आहे. सेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही जोरात आहेत. त्यामुळे सेनेच्या आमदारांची मनधरणी करण्याचा कसा प्रयत्न करायचा याविषयीही खलबते या बैठकीत होणार असल्याचे समजते.

सत्तेत आल्यापासून शिवसेना सातत्याने सरकारवर टीका करत आहे. हे सरकार नालायक असल्याची टीका करण्यापर्यंत सेना नेत्यांची मजल गेल्याने भाजप वेगळा विचार करत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. सेनेच्या सततच्या विरोधाला कंटाळून भाजपने स्थिर सरकार बनवण्यासाठी मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संभाव्य राजकीय परिस्थितीत शिवसेनेच्या राजकीय भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपच्या दबाव तंत्राला बळी न पडता सरकारमधून बाहेर पडण्याची आग्रही मागणी काही आमदारांनी केली आहे. त्याचबरोबर सेना मंत्री आणि आमदारांमध्ये असलेल्या विसंवादावरही या बैठकीत मार्ग काढण्यात येणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाची भूमिकेबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 25 हजार मते आहेत. तर भाजपला या निवडणुकीत 20 हजार मतांची आवश्‍यकता भासणार आहे. त्यामुळे शिवसेना भाजपला कोंडीत पकडू शकते. यासर्व बाबींचा विचार करण्यासाठी हा बैठक महत्त्वपूर्ण असल्याचे साधण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com