shivsena | Sarkarnama

सेना नेत्यांची गोलमाल उत्तरे  अन्‌ पोकळ दमबाजी! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबईतील महापालिका निवडणूक निकालानंतर सेना नेत्यांना नक्की काय भूमिका घ्यायची, याचा प्रश्‍नच पडला. खासदार संजय राऊत एकीकडे म्हणतात की सरकार टिकेल या भ्रमात राहू नका. पण सरकारमधून कधी बाहेर पडणार, या प्रश्‍नावर ते सरकार नोटीस पिरीयडवर असल्याचे सांगतात. भाजपची मदत मुंबई महापालिकेत घेणार नसल्याचे एका उत्तरात सांगतात. तर दुसरीकडे मुंबईच्या भल्यासाठी कोणीही हात पुढे केला तरी तो नाकारणार नाही, असेही म्हणतात. एकाच वेळी भाजपला दमात घ्यायचे आणि दुसरीकडे गोंजारायचे देखील असे प्रयोग सध्या शिवसेनेचे सुरू आहेत.

मुंबईतील महापालिका निवडणूक निकालानंतर सेना नेत्यांना नक्की काय भूमिका घ्यायची, याचा प्रश्‍नच पडला. खासदार संजय राऊत एकीकडे म्हणतात की सरकार टिकेल या भ्रमात राहू नका. पण सरकारमधून कधी बाहेर पडणार, या प्रश्‍नावर ते सरकार नोटीस पिरीयडवर असल्याचे सांगतात. भाजपची मदत मुंबई महापालिकेत घेणार नसल्याचे एका उत्तरात सांगतात. तर दुसरीकडे मुंबईच्या भल्यासाठी कोणीही हात पुढे केला तरी तो नाकारणार नाही, असेही म्हणतात. एकाच वेळी भाजपला दमात घ्यायचे आणि दुसरीकडे गोंजारायचे देखील असे प्रयोग सध्या शिवसेनेचे सुरू आहेत. "सामना'मधून भाजपनेत्यांना इतके झोडपण्यात येत आहे की त्यात त्यांच्या तोंडाचेही नको ते वर्णन करण्यात येत आहे. एकूणच मुंबईत सेनेचा महापौर होईपर्यंत सेनेला दुहेरी भूमिका बजावण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसते आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख