ओमी कलानींच्या पक्षप्रवेशाला उल्हासनगरातील शिवसैनिकांचा विरोध

ओमी कलानींच्या पक्षप्रवेशाला उल्हासनगरातील शिवसैनिकांचा विरोध

उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाचे पडसाद उल्हासनगरात उमटु लागले आहे. पप्पू कालानी पुत्र ओमी कालानी शिवसेनेच्या वाटेवर अशा वावळ्या उठू लागताच आज शिवसेना-युवासेना-ग्राहक संरक्षण कक्ष-उत्तर भारतीय सेनेच्या  पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत ओमी कलानी यांच्या पक्षप्रवेशाला प्रखर विरोध केला आहे. पदाधिकाऱ्यांच्या या विरोधाला वरिष्ठ पातळीवर पोहचवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली

शिवसेना- भाजपा युती होणार की नाही, याचा निर्णय अद्यापही झाला नाही. युती झाल्यास उल्हासनगर विधानसभा क्षेत्र भाजपाच्या वाटयाला असल्याने  माजी आमदार कुमार आयलानी,  ओमी कालानी, महापौर पंचम कालानी हे प्रमुख स्पर्धेत आहेत. त्यात भाजप सोबत असल्याने आठवले गटाचे नगरसेवक व गटनेते भगवान भालेराव यानी देखील तिकीटासाठी दावा केलेला आहे. युती नाही झाल्यास भाजपाकडून वरील नावांपैकी कोण, हा पेच आहे.

शिवसेनेकडून शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचे नाव शिवसैनिकांच्या तोंडी आहे.राजेंद्र चौधरी, ओमी कालानी, भगवान भालेराव यांचे फोटो भावी आमदार म्हणून समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत. दुसरीकडे भाजपने तिकीटासाठी प्रतिसाद दिला नाही तर ओमी कालानी हे शिवसेनेकडून प्रयत्न करणार अशा वावड्या उठू लागल्या आहेत.

या संभाव्य प्रवेशाचे नकारात्मक पडसाद आज शिवसेनेत उमटले. उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, उत्तर भारतीय शहर संघटक के.डी.तिवारी, विभागप्रमुख सुरेश सोनवणे, राजन वेलकर, शिवाजी जावळे, युवासेनेचे सागर पगारे, ज्ञानेश्वर मरसाळे,पप्पू जाधव आदिंच्या बैठकीत कलानी यांच्या नावाला विरोध झाला.

ओमी कालानी यांची स्वतंत्र टीम आहे. भाजपात त्यांच्या टिमच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यांच्या पत्नी पंचम कालानी ह्या भाजपाच्याच महापौर आहेत. मात्र ओमी यांनी भाजपा ऐवजी त्यांची टीम वाढवण्याला प्राधान्य दिले आहे. जर शिवसेनेने ओमी यांना प्रवेश दिल्यास हिच परिस्थिती शिवसेने सोबत होणार असून ते शिवसेनेला पोखरून त्यांची टीम मजबूत करण्यावरच लक्ष केंद्रित करणार. त्यामुळे ओमी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला आजच्या बैठकीत विरोध करण्यात आला. शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांची भेट घेऊन विरोध कळवला आहे, अशी माहिती युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे यांनी दिली.

यावृत्ताला राजेंद्र चौधरी यांनी दुजोरा दिला आहे. पदाधिकाऱ्यांचा हा विरोध पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कळवणार असे चौधरी यांनी सांगितले.
या संदर्भात ओमी कालानी यांच्याशी संपर्क साधला, आपण अद्याप तरी शिवसेनेकडे तिकीटासाठी गळ घातलेली नाही.असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आपल्याविषयी शहरात नकारात्मक वातावरण तयार करण्यात येत आहे .त्याचे रूपांतर लवकरच सकारात्मक मध्ये परिवर्तित होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com