shivrajsingh-criticises-opponents | Sarkarnama

`ज्यादा जोगी, मठ उजाड'; शिवराजसिंह चौहान यांची मोदीविरोधकांवर शेलकी टीका

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जानेवारी 2019

`ज्याद जोगी, मठ उजाड' अशा शेलक्या शब्दांत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कोलकता येथे जमलेल्या मोदीविरोदकांवर केली आहे.

पुणे : `ज्याद जोगी, मठ उजाड' अशा शेलक्या शब्दांत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज कोलकता येथे जमलेल्या मोदीविरोदकांवर केली आहे.

`22 पक्ष. काही खासदार. तीन-चार पंतप्रधानपदाचे दावेदार. सत्ता संपादनाची आस,' असे ट्विट करीत चौहान यांनी म्हटले आहे, की मुंगेरीलालसारखी दिवा स्वप्न पाहण्यावर कोणालाही बंदी नाही. 

शिवराजसिंह चौहान यांनी केलेली ही टीका कॉंग्रेसला चांगलीच झोंबली आहे. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी चौहान यांना उत्तर देताना म्हटले आहे, की 24 पक्षांच्या आघाडी सरकारचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. तेव्हा तुमचे विचार काही वेगळेच होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख