कोणी वरचढ ठरतो आहे, हे लक्षात येताच आनंदराव त्याला ठेचतात !

प्रताप पाटील हे त्यांचे पुत्र एवढीच पक्षातत्यांची ओळख आहे.
कोणी वरचढ ठरतो आहे, हे लक्षात येताच आनंदराव त्याला ठेचतात !

कऱ्हाड (सातारा) :  काँग्रेस पक्षात आपल्याला कोणी वरचढ ठरतो आहे, हे लक्षात येताच त्या प्रत्येकाला ठेचण्याचीच आनंदराव पाटील यांची वृत्ती आहे.  त्यांची ही हुकूमशाही यापुढे खपवून घेतली जाणार नाही, अशा इशारा विद्यार्थी कॉग्रसेचे नेते शिवराज मोरे यांनी दिला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या मुलावर कऱ्हाड पोलिसात दाखल झालेली तक्रार माझ्यामुळेच दाखल झाली आहे. हा पुर्वग्रह मनात ठेवून त्यांनी पोलिसांवर दबाव आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे, असे स्पष्टीकरण श्री. मोरे यांनी निवेदनातून केले आहे.

श्री. मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की वास्तविक 12 सप्टेंबर रोजी प्रताप आनंदराव पाटील यांच्या विरूद्ध कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दमदाटी व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तो दाखल करण्यामागे शिवराज मोरे यांचाच हात आहे, असा समज करून घेवून आनंदराव पाटील यांनी बोरगाव पोलिस ठण्यात माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या पेट्रोल पंपावर हा प्रकार झाला आहे. तो त्यांच्या पंपावरील कर्मचाऱ्यांकडून दाखल केल्याचे दिसते. मात्र तो गुन्हा खोटा आहे.

त्यांच्या तक्रारीप्रमाणे 13 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता घटना घडली होती. असे असताना 14 सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास हा गुन्हा का दाखल केला आहे. तो गुन्हा कर्मचाऱ्यास दमदाटी केल्याबाबत दाखल केला असुन त्यात पैसे बुडवल्याचे जाणीवपूर्वक व खोटा उल्लेख केला आहे. त्याबाबत आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील तसेच हा गुन्हा दाखल करण्यामागे ज्यांचा कोणाचा हात आहे, त्यांच्यावर  करणार आहोत. पक्षात वरचढ ठरलो म्हणून माझा राजकीय व्देष आनंदराव पाटील करीत आहेत. प्रताप पाटील हे त्यांचे पुत्र एवढीच पक्षात त्यांची ओळख आहे. त्यामुळे पुत्र प्रेमापोटी कॉग्रसेच्या बांधणीला व युवकांच्या संघटनालाच थेट धक्का पोचवून पक्षद्रोही काम ते करत आहेत. यापुढे त्यांची हुकूमशाही लोकशाही पद्धतीने आम्ही हाणून पाडू, असाही इशारा श्री. मोरे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com