शिवराजसिंह चौहान आज रात्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार 

याही परिस्थितीत काही डाव कमलनाथ खळेले, मात्र ते य़शस्वी झाले नाहीत.
shivraj singh chauhan to take oath today night as chief minister of madhya pradesh 
shivraj singh chauhan to take oath today night as chief minister of madhya pradesh 

पुणे: मध्य प्रदेश भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आज चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी भाजप संसदिय पक्षाच्या बैठकीत नेता निवड झाल्यानंतर रात्री 9 च्या सुमारास त्यांचा शपथविधी होवू शकतो. 

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पंधरा दिवसांपासूनच डळमळीत झाले होते. काँग्रेसमधील ज्योतिरादित्य समर्थक 22 आमदारांनी भाजपच्या समर्थनार्थ आमदारकीचे राजीनामे दिल्याने कमलनाथ यांची पुरती कोंडी झाली होती. ज्योतिरादित्य यांनी प्रत्यक्षात काँग्रेसचा राजीनामा देवून भाजप प्रवेश केल्यामुळे कमलनाथ यांना राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. 

याही परिस्थितीत काही डाव कमलनाथ खळेले, मात्र ते य़शस्वी झाले नाहीत. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देवूनही त्यांनी ते सिद्ध न करता अधिवेशन संस्थगित गेले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर कमलनाथ यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले, मात्र त्यांच्याकडे संख्याबळ जमले नाही. त्यामुळे तीन दिवसांपुर्वी त्यांनी राजीनामा दिला.

कमलनाथ सरकार कोसळल्यामुळे भाजप सरकार कधी स्थापन करणार आणि मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू होती. भाजपमध्ये इतर नावेही पुढे आली मात्र सरकार मजबुतीने टिकण्यासाठी शिवराजसिंह हेच योग्य आहेत, असा निर्णय भाजपमध्ये झालेला आहे. त्यावर आज सायंकाळी शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करून शपथविधी उरकला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com