... म्हणून शिवराज पाटील चाकूरकरआरएसएस'च्या व्यासपीठावर

आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. यानिमित्ताने गौरव समितीच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात डॉ. कुकडे यांचा चाकूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डी.लीट मिळाल्याबद्दल डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांनाही या वेळी गौरविण्यात आले.
... म्हणून शिवराज पाटील चाकूरकरआरएसएस'च्या व्यासपीठावर

लातूर : चांगली माणसे सोबत घेऊन काम करण्याची निर्णय क्षमता आपल्याकडे नसेल तर संस्था, रुग्णालयच काय सरकारसुद्धा नीट चालू शकत नाही; पण डॉ. अशोक कुकडे यांना चांगल्या माणसांचे बळ मिळाले. त्यामुळे त्यांना आरोग्य सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवता आली, असे गौरवोद्गार माजी राज्यपाल शिवराज पाटील-चाकूरकर यांनी सोमवारी येथे काढले. तुम्ही ‘त्या’ (आरएसएस) मंचावर कशाला गेलात, असा प्रश्न आता मला अनेकजण विचारतील; पण आपण चांगल्या कामाच्या पाठीशी राहिले पाहीजे, असेही ते म्हणाले.

आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. यानिमित्ताने गौरव समितीच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात डॉ. कुकडे यांचा चाकूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डी.लीट मिळाल्याबद्दल डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांनाही या वेळी गौरविण्यात आले.

चाकूरकर म्हणाले, "याआधी मी माझ्या विरोधात उभे राहिलेले समाजवादी नेते मनोहर गोमारे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होतो. आता डॉ. कुकडे यांच्या सत्कार सोहळ्याला आलो आहे. त्यामुळे काही लोक मला विचारतील 'अशा व्यासपीठावर का गेलात?' पण असा प्रश्न विचारणाऱ्यांना मला सांगायचे आहे, जे चांगले आहे त्याला चांगले म्हंटले पाहिजे. आजच्या काळात राजकीय द्वेषाची गरज नाही. जो विचार सर्वमान्य आहे, सर्वांच्या कल्याणाचा आहे, तो आपण पुढे न्यायला हवा."

चाकूरकर म्हणाले, "मी न्यायालयात प्रॅक्टीस करण्यासाठी लातूरात आलो, त्याचवेळ डॉ. कुकडे हे पुण्यातून लातूरात आले. पण राजकारणामुळे मला लातूरमध्येच राहता आले नाही. डॉ. कुकडे यांनी मात्र लातूरमध्येच राहून आरोग्यसेवेत मोलाचे योगदान दिले. त्यांचे कार्य लातूरकर कधीही विसरणार नाहीत. आपण सर्व एकाच बिजाची फळे आहोत, हा विचार घेऊन विवेकानंद रूग्णालय वृद्धींगत होत आहे. या कामाची आणि विचाराची दखल घेऊन डॉ. कुकडे यांना पद्मभूषण मिळाला. हा लातूरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे.’’

या वेळी महापौर सुरेश पवार, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक कैलाश शर्मा, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार अमित देशमुख, समाजवादी नेते मनोहर गोमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

हा सन्मान लातूरकरांना अर्पण
माझी ‘लढे सिपाही, नाम सरदार का’ या म्हणीप्रमाणे स्थिती झाली आहे. वैद्यकीयच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मदतीने आम्ही सामाजिक, वैद्यकीय कार्य करू शकलो. हा संघटित शक्तीचा एकप्रकारचा प्रयोगच होता. लातूरातील अशा प्रकारच्या सामाजिक निरोगी वातावरणातून आम्ही वैद्यकीय निरोगी वातावरण फुलविण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल घेऊन जो सन्मान मिळाला तो मी लातूरकरांना अर्पण करत आहे. या सन्मानामुळे उर्जा वाढली आहे. थांबायचं नाही, थकायचं नाही म्हणत हे काम यापुढेही चालूच राहील, अशा भावना डॉ. कुकडे यांनी व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com