shivraj patil chakurkar and election | Sarkarnama

देशात लोकसभा व विधानसभेची एकत्र निवडणूक अशक्‍य - शिवराज पाटील चाकूरकर 

हरी तुगावकर 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

लातूर : एक देश एक निवडणूक ही चांगली संकल्पना आहे. पण या करीता राज्यघटनेत बदल करावा लागेल. पण भारता सारख्या देशात ते शक्‍य नाही, असे 
मत माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

लातूर : एक देश एक निवडणूक ही चांगली संकल्पना आहे. पण या करीता राज्यघटनेत बदल करावा लागेल. पण भारता सारख्या देशात ते शक्‍य नाही, असे 
मत माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

अमेरिकेत राज्याध्यक्ष चार वर्ष राहतो. त्याला काढता येत नाही. तशी 
त्यांनी राज्यघटनेत तरतूद करून ठेवली आहे. खरे तर एक देश एक निवडणूक ही चांगली संकल्पना आहे. पण आपल्या देशात राबवणे अशक्‍य आहे. आपल्या देशात 
वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या निवडणुका होतात. एकाच वेळी निवडणूक घ्यायचे झाल्यास अनेक राज्याची सरकार बरखास्त करावी लागतील. इतकेच नव्हे 
तर राज्य घटनेतही तसा बदल करावा लागले. याला मोठा विरोध होईल. त्यामुळे आपल्या देशात एक देश एक निवडणूक घेणे अशक्‍य आहे, असे ते म्हणाले. 

सध्या देशभर जातीच्या आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. जातीवर आरक्षण असू नये. देशात साडे तीन हजार जाती आहेत. सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे का? हा खरा 
प्रश्न आहे. जातीवर आरक्षण दिले गेले तरी ते संबंधीत जातील श्रीमंतांनाच त्याचा फायदा होईल. गरीब मात्र तसेच राहतील. त्यामुळे आर्थिक निकषावरच आरक्षण देण्याची गरज आहे, असे श्री. चाकूरकर म्हणाले. समाजात आज 50 टक्के महिला आहेत. त्यांना संसदेत केवळ आठ टक्के आरक्षण आहे. किमान त्यांना 33 टक्के आरक्षण देण्याची गरज आहे. 

गेल्या काही महिन्यापासून मतदानाच्या ईव्हीएम मशीनची चर्चा आहे. अनेकांचा विरोध होत आहे. बॅलेटपेपरवर निवडणूक घ्यावी अशीही मागणी होत आहे. पण ते 
चुकीचे आहे. आणीबाणीनंतर 1980 मध्ये इंदिरा गांधी यांचे सरकार मोठ्या मताधिक्‍याने निवडणूक आले होते. मी देखील दोन लाखाच्या मताधिक्‍याने 
निवडणूक आलो होते. त्यावेळी श्रीमती गांधी यांचा प्रभाव नाही तर मतदानाची शाई बदलली अशी चर्चा झाली होती. ईव्हीएम मशीन असलीच पाहिजे, असे ते 
म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख