shivnath jadhav shetkari saghatna | Sarkarnama

मादनाईक यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक विसरू नये - शिवनाथ जाधव

संपत मोरे
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी मागील विधानसभा म्हणजे 2014 ची निवडणूक विसरून नये, त्यांच्या नेत्याला अनेक गावांत बंदी असताना सदाभाऊ खोत त्यांचा प्रचार करत होते, सदाभाऊंनी केलेल्या उपकाराचा त्यांना विसर पडलाय अशा शब्दात रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव यांनी मादनाईक यांना उत्तर दिले. 

जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत सावकार मादनाईक यांनी "सदाभाऊ खोत यांनी माढ्यातून लढावे "असे आव्हान दिले होते. त्याला जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. 
ते म्हणाले,"उल्हास पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे तालुक्‍यात काय परिस्थिती निर्माण झाली होती? तुमचे नेते, तुमच्या प्रचाराला का येत नव्हते? ते कोणत्या बिळात लपून बसले होते? तेव्हा तुमचा प्रचार करायला आणि तुमची पाठराखण करायला सदाभाऊ खोत आले होते. त्यानी अडचणीच्या काळात उभा राहून तुमच्यावर जे उपकार केले त्याची अशी परतफेड करता का ? सदाभाऊंनी माढ्यातून त्यांची ताकद दाखवून दिली आहे. आता तुमच्या नेत्याना सांगलीतून लढायला सांगा असाही सल्ला शिवनाथ जाधव यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख